आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इंटरव्ह्यू:'पुष्पा-द राइज'च्या यशाने आनंदी अल्लू अर्जुनने सांगितले - 2 महिन्यांनंतर तो पार्ट 2 च्या चित्रीकरणाला करणार सुरुवात

उमेशकुमार उपाध्याय11 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • वाचा काय सांगतोय अल्लू अर्जुन -

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा - द राइज' हा चित्रपट रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता अलीकडेच अल्लू अर्जुनने दिव्य मराठीसोबतच्या खास बातचीतमध्ये 'पुष्पा' आणि चित्रपटाच्या यशाशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. वाचा काय सांगतोय अल्लू अर्जुन -

 • 'पुष्पा-द रुल'चे शूटिंग कधी सुरू करणार?

दोन महिन्यांत 'पुष्पा 2'चे शूटिंग सुरू करणार आहे. आता मला फक्त थोडी विश्रांती घ्यायची आहे. मी 'पुष्पा-1' ते 'पुष्पा-2' दरम्यान 30-40 दिवसांचा ब्रेक घेत आहे. मला कुठेतरी 30-40 दिवस घालवायचे आहेत.

 • 'पार्ट-1' पेक्षा 'पार्ट-2' मधून प्रेक्षकांच्या जास्त अपेक्षा आहेत, यापेक्षा जास्त काय असेल?

आम्हाला 'पुष्पा-1' पेक्षा 'पुष्पा 2'साठी अधिक काम करायचे आहे, कारण आम्हाला इतकी मोठी संधी मिळाली आहे. म्हणूनच आम्हाला चांगले प्रॉडक्ट बनवायचे आहे, यासाठी आम्ही अधिक प्रयत्न करत आहोत. यावेळी अनेक आव्हाने आहेत, पण मजादेखील खूप येईल.

 • 'पुष्पा' ब्लॉकबस्टर ठरला, पण पहिला पॉझिटिव्ह फिडबॅक कोणाचा होता?

माझे संगीत दिग्दर्शक देवी श्री प्रसाद यांचा. कारण ते संगीत करत होते, त्यामुळे आमचे पहिले प्रेक्षकही तेच होते. त्यांना हा चित्रपट खूप आवडला. त्यानंतर आमच्या एडिटरचा फिडबॅक मिळाला. एडिटिंग करताना ते परफॉर्मन्स पाहत होते, त्यामुळे त्यांनाही हा चित्रपट खूप आवडला. या दोघांकडून सर्वात पहिली आणि सर्वात चांगली प्रतिक्रिया मिळाली होती.

 • बॉलिवूडमध्ये कोणत्या निर्माता-दिग्दर्शकासोबत तुला काम करायचे आहे?

जो कोणी चांगली स्क्रिप्ट घेऊन येईल, त्याच्यासोबत मला काम करायला आवडेल. बॉलिवूडमध्ये अनेक चांगले चित्रपट निर्माते आहेत. मला एक चांगला प्रोजेक्ट करायचा आहे, त्यासाठी मी तयार आहे. मला काहीही निश्चित असे ठरवायचे नाही. मला फक्त एक्सप्लोर करायचे आहे. परंतु, आजपर्यंत कोणीही अशा प्रकारचा संपर्क साधला नाही.

 • तू म्हणाला होता की दोन वर्षांत बॉलिवूडमध्ये नक्कीच काहीतरी करणार?

एक-दोन अनौपचारिक बैठका झाल्या, पण तशी बोलणी काही निश्चित झाली नाहीत. कधी-कधी फिल्ममेकर्स पार्टी वगैरेमध्ये भेटतात, मग हाय-हॅलो केल्यावर आपण नक्कीच काहीतरी चांगलं करू असं सांगतात. काही झाले की कळवतो, असे म्हणतात. मी पण असेच सांगतो. या सर्व गोष्टी आजवर घडल्या आहेत, पण काहीही निश्चित ठरलेले नाही.

 • बॉलिवूडमधील कोणत्या हिरो-हिरोईनसोबत तुला स्क्रीन शेअर करायला आवडेल?

कुणासोबतही... ज्यांना त्यांची व्यक्तिरेखा आवडेल आणि मलाही आवडेल. मला स्क्रिप्ट खूप महत्त्वाची वाटते. स्क्रिप्टमध्ये जी मागणी असेल, त्याच्यासोबत काम करायला आवडेल. माझे असे वैयक्तिक अशी काही आवड नाही. गरज माझी आवडती आहे. गरजेनुसार एखादा अभिनेता मिळाला तर मला खूप मजा येते. या चित्रपटात मला आयपीएस शेखावतचा चांगला परफॉर्मन्स हवा होता, ती भूमिका फहाद फासिलने साकारली. तो खूप चांगला कलाकार आहे. मल्याळम अभिनेता आहे. मला वाटले फहादने जर हे पात्र साकारले तर ते खूप छान होईल. ही व्यक्तिरेखा फहादला सांगितली गेली, त्यानंतर त्याने ती भूमिका साकारली. फहादने हे पात्र साकारले याचा मला खूप आनंद आहे.

 • साऊथच्या स्टार्ससारखे फॅन फॉलोइंग इतर इंडस्ट्रीत दिसत नाही, याविषयी काय सांगशील?

असे येथील लोकांचे प्रेम आहे. मी खूप भाग्यवान आहे की चाहत्यांचे इतके प्रेम मिळाले. ते खूप प्रेम आणि आदर करतात. आम्ही आमच्या चाहत्यांवरही खूप प्रेम करतो आणि आम्हाला जबाबदारीही वाटते. ही जबाबदारीही माझी आहे. मी काही चूक केली तर त्याचा परिणाम होईल हे लक्षात ठेवावे लागते. म्हणूनच मी सामाजिक भान पाळतो. हे गिव्ह अँड टेक आहे मला वाटते.

 • चित्रपटात एक संवाद आहे की पुष्पा झुकेगा नही, वास्तविक जीवनात असे काही तत्वज्ञान आहे का?

होय, नक्कीच आहे. मी नतमस्तक होणार नाही. मी मागे बघणार नाही. मला पुढे जायचे आहे.

 • पुष्पराज म्हणतो – हा ब्रँड मी स्वबळावर तयार केला आहे, इथपर्यंत पोहोचण्याचे श्रेय तू किती लोकांना देतो आणि स्वतः किती घेतो?

हे सर्व प्रेक्षकांचे प्रेम आहे, त्यात माझे काहीच नाही. इथपर्यंत पोहोचण्याचे श्रेय प्रेक्षकांना जाते.

 • हिंदी चित्रपटसृष्टीतील कोणत्या चित्रपट निर्मात्यावर तुमचा विश्वास आहे, जो तुझी प्रतिभा पडद्यावर दाखवू शकेल?

मी मुळात दक्षिण भारतीय आहोत आणि व्यावसायिक चित्रपट करतो. जर आपण व्यावसायिक चित्रपटाच्या शैलीबद्दल बोललो, तर रोहित शेट्टी हा बॉलिवूडमधील सर्वोत्तम व्यावसायिक चित्रपट दिग्दर्शक आहे. ते चांगले व्यावसायिक चित्रपट करतात.

 • या यशोशिखरावर आज प्रत्येकजण तुला पाहत आहे, परंतु तुझ्या कारकिर्दीतील भावनिक क्षण कोणता आहे?

सध्या हा चित्रपट भावनिक भाग आहे. आम्ही हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित केला आहे. सगळ्यांना इतक्या भाषेत दिसेल असं वाटलं नव्हतं. फक्त एक किंवा दोन भाषेत चित्रपट चालेल असे वाटले होते. पण, लोक तेलुगू ते तामिळ, मल्याळम, कन्नड आणि आता हिंदीच्या पट्ट्यात बघत आहेत. एवढ्या मोठ्या प्रतिसादाची अपेक्षा कधीच केली नव्हती. चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी विचार केला होता की, हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित करून बघूया कसा प्रतिसाद मिळेल, किती मिळेल. पण एवढा उदंड प्रतिसाद मिळाला की, मन प्रसन्न झाले. मी खूप भाग्यवान आहे की मला कधीही कोणत्याही मोठ्या समस्येचा सामना करावा लागला नाही.

 • तू या व्यक्तिरेखेपेक्षा पूर्णपणे वेगळा आहेस, या लूकमध्ये यायला किती वेळ लागला?

चार लुक टेस्ट दिल्या. त्यापैकी एक फायनल झाली. या चार लूक टेस्ट द्यायला पूर्ण दोन महिने लागले, कारण ते एकामागून एक लूक टेस्ट करत होते.

बातम्या आणखी आहेत...