आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या व्हॅनिटी व्हॅन 'फॅल्कॉन' चा अपघात झाला आहे. शनिवारी खम्मममध्ये ही दुर्घटना घडली. रिपोर्ट्सनुसार, अपघातावेळी अल्लू अर्जुन व्हॅनिटीत उपस्थित नव्हता. त्यांच्या मेकअप टीमचे काही सदस्य व्हॅनमध्ये होते मात्र सुदैवाने त्यांनाही कोणतीही इजा झाली नाही. मात्र व्हॅनिटीची बऱ्यापैकी नुकसान झाले आहे.
रिपोर्ट्सनुसार चित्रीकरण संपल्यानंतर अल्लू अर्जुनची मेकअप टीम व्हॅनिटी व्हॅनमधून आंध्र प्रदेशातील मरेदुमिल्लीहून हैदराबादला जात होते. यादरम्यान व्हॅनला पाठीमागून एका वाहनाने धडक दिली. याप्रकरणी खम्मम ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुन 'पुष्पा' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केल्यानंतर राजमुंदरीहून विमानाने परतला होता. घरी परतल्यानंतर अल्लूच्या पत्नीने त्यांच्या मुलांसोबत काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते.
तब्बल 7 कोटींची आहे अल्लूची ही व्हॅनिटी व्हॅन
अल्लू अर्जुनची व्हॅनिटी व्हॅन 'फाल्कन' ही त्याच्या सर्वात मौल्यवान संपत्तीपैकी एक आहे. 2019 मध्ये अल्लूने स्वतः ह्या व्हॅनिटीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. टाइम्स ऑफ इंडियानुसार अल्लू अर्जुनच्या या हा व्हॅनिटी व्हॅनची किंमत जवळपास 7 कोटी रुपये आहे. याचे इंटीरियर शानदार आहे. या व्हॅनिटीवर अल्लू अर्जुनची स्वाक्षरी 'AA' चा लोगो देखील लावलेला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.