आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्याच्या मनाचा मोठेपणा:'चेहरे'च नव्हे तर अमिताभ बच्चन यांनी संजय लीला भन्साळींच्या 'ब्लॅक' चित्रपटासाठीही घेतले नव्हते मानधन

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमिताभ यांनी 'ब्लॅक' चित्रपटासाठीही घेतले नव्हते मानधन

अभिनेते अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला 'चेहरे' हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला आहे. या चित्रपटाच्या स्क्रिप्टने बिग बी इतके प्रभावित झाले की, त्यांनी या चित्रपटासाठी मानधन न घेता काम करण्यास होकार दिला होता. इतकेच नाही तर पोलंडला चित्रीकरणासाठी ते स्वखर्चाने गेले होते. या चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित यांनी खुलासा केला आहे की, टॅक्स कारणांमुळे अमिताभ यांना चित्रपटात 'फ्रेंडली अपियरन्स' क्रेडिट देण्यात आले आहे.

अमिताभ यांनी 'ब्लॅक' चित्रपटासाठीही घेतले नव्हते मानधन
अमिताभ बच्चन यांनी एखाद्या चित्रपटासाठी मानधन न घेतल्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी त्यांनी संजय लीला भन्साळींच्या ब्लॅक या चित्रपटासाठीही पैसे घेतले नव्हते. कारण त्यांना दिग्दर्शकासोबत काम करायचे होते. अमिताभ यांनी या चित्रपटात राणी मुखर्जीने शिक्षकाची भूमिका वठवली होती. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

अमिताभ यांना संजय लीला भन्साळींसोबत करायचे होते काम

2017 मध्ये 'ब्लॅक'च्या या चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर लिहिले होते, "मला संजय यांचे सर्व काम बघता त्यांच्यासोबत काम करायचे होते... आणि जेव्हा संधी आली तेव्हा ती जबरदस्त होती. मी या चित्रपटासाठी मानधन घेतले नव्हते.. यासारख्या चित्रपटाचा एक भाग असणे हेच माझ्यासाठी महत्त्वाचे होते."

दिलीप साहेबांनीही हा चित्रपट प्रीमियरमध्ये पाहिला

अमिताभ पुढे म्हणाले होते, "जेव्हा आम्ही सर्वांनी प्रीमियरमध्ये हा चित्रपट पाहिला, तेव्हा मला फक्त आनंदाश्रू आले आणि अर्थातच प्रेक्षकांमध्ये दिलीप साब असणे हे माझे बालपणीचे स्वप्न पूर्ण झाले. चित्रपट संपल्यावर, ते हॉलच्या बाहेर उभे होते, त्यांनी माझा हात हातात धरला आणि माझ्या डोळ्यात पाहिले ... हा तो क्षण होता जो मी आयुष्यभर जगण्यास तयार होतो."

बातम्या आणखी आहेत...