आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आल्ट बालाजीची नवीन वेब सीरिज:मिलिंद सोमण आणि शिल्पा शिंदेचा 'पौरषपूर' रिलीजपूर्वीच बोल्ड दृश्यांमुळे चर्चेत

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अलीकडेच या वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला असून त्यात बोल्ड दृश्यांचा भरणा बघायला मिळतोय.

‘पौरषपूर’ या वेब सीरिजचा ट्रेलर अलीकडेच लाँच झाला आहे. ही वेब सीरीज ऑल्ट बालाजी आणि जी5 वर रिलीज होणार आहे. रिलीजपूर्वीच ही वेब सीरिज त्यातील बोल्ड दृश्यामुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये फिटनेस फ्रिक म्हणून ओळखला जाणारा मिलिंद सोमण एका महत्त्वाच्या व्यक्तिरेखेत झळकणार असून त्याच्यासह शिल्पा शिंदे, अन्नू कपूर, शाहीर शेख, पौलमी दास, साहिल सलाथिया आणि फ्लोरा सैनी यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

ही वेब सीरिज येत्या 29 डिसेंबरला रिलीज होणार आहे. तत्पूर्वी रिलीज झालेल्या जवळजवळ दोन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये बोल्ड दृश्यांचा भरणा बघायला मिळतोय. याशिवाय भव्यदिव्य सेटची झलकही दिसतेय.

'पौरषपूर' ही वेब सीरिज पुरुषी मक्तेदारीविरोधात, महिलांना मिळणारी असमान वागणूक यावर आधारित आहे. पौरषपूरचा राजा अन्नू कपूर आणि त्यांची पत्नी शिल्पा शिंदे यांच्यातील नात्यात तणाव असतो. राजाला बऱ्याच राण्या आहेत. राजा आपल्या कोणत्याच राणीला राज्याबाहेर जाऊ देत नाही. त्यानंतर राणी मीरावती (शिल्पा शिंदे) राज्यातून गायब होऊन शत्रू बोरीस (मिलिंद सोमण) याच्याशी हातमिळवणी करून सूड घेते, असे या ट्रेलरमध्ये दिसते. या वेब सीरिजमध्ये मिलिंदने साकारलेले बोरीस हे पात्र तृतीयपंथी असल्याचे दाखवण्यात आले आहे.

शिल्पा शिंदेने पौरषपूरच्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवले आहे. या सीरिजचे 7-8 भाग असणार आहेत. या शोचे दिग्दर्शन सचिंद्र वत्स हे करत आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser