आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमर-अकबर-अँथोनीची 43 वर्षे:अमिताभ बच्चन म्हणाले- जेव्हा मनमोहन देसाई ही कल्पना घेऊन माझ्याकडे आले तेव्हा मला वाटले की ते शुद्धीत नाहीत 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमिताभ यांनी चित्रपटाच्या सेटवरचा श्वेता आणि अभिषेकसोबतचा त्यांचा एक फोटोदेखील शेअर केला आहे.

महानायक अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या 'अमर-अकबर-अँथनी' या चित्रपटाच्या रिलीजला बुधवारी (27 मे) 43 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांनी आठवणींचा खजिना उघडला आणि या चित्रपटाशी संबंधित एक कहाणी सोशल मीडियावर शेअर केली. त्यांनी सांगितले की, त्यावेळी या चित्रपटाने जो व्यवसाय केला तो सध्याच्या परिस्थितीतील 'बाहुबली 2'च्या कलेक्शनपेक्षाही अधिक आहे. त्यांनी चित्रपटाच्या सेटवरचा श्वेता आणि अभिषेकसोबतचा एक फोटोदेखील शेअर केला आहे.

अमिताभ यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'अमर-अकबर-अँथनीच्या सेटवर श्वेता आणि अभिषेक मला भेटायला आले होते ... त्यावेळी मी हॉटेल हॉलिडे इनच्या बॉलरूममध्ये' माय नेम इज अँथोनी गोन्साल्विस' या गाण्याचे शूट करत होतो.. "हा फोटो बीचच्या समोरचा आहे... आज... AAAला 43 वर्षे झाली आहेत."

  • मला वाटले होते की मनजी शुद्धीत नाहीत

पुढे त्यांनी लिहिले, 'मन जी (मनमोहन देसाई) मला या चित्रपटाची कल्पना सांगायला आले.. आणि जेव्हा त्यांनी त्याचे शीर्षक सांगितले तेव्हा मला वाटले की ते शुद्धीत नाहीत.. 70 च्या दशकात जेव्हा चित्रपटांचे शीर्षक स्त्रीप्रधान असायचे तेव्हा हे त्यापेक्षा पूर्णपणे वेगळं होतं... पण...'

  • एकट्या मुंबईत 25 आठवडे चालला होता चित्रपट

ते पुढे म्हणाले, 'रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने त्यावेळी 7.25 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता... जर आज त्याची तुलना केली गेली तर चित्रपटाचे त्याकाळाती कलेक्शन 'बाहुबली 2'च्या कलेक्शनला मागे टाकेल... म्हणणारे म्हणतात की हिशेबाचे काय करायचे आहे... पण प्रत्यक्षात चित्रपटाने मोठा व्यवसाय केला होता… एकट्या मुंबईतील 25 चित्रपटगृहांत 25 आठवडे पूर्ण केले होते… आता तसे होत नाही... गेले ते दिवस...

  • मंगळवारी 'बंटी और बबली'ची काढली होती आठवण

बिग बींच्या 'बंटी और बबली'च्या रिलीजला मंगळवारी 15 वर्षे पूर्ण झाली होती. यानिमित्ताने अमिताभ यांनी चित्रपटाची आठवण करत मुलगा अभिषेकसोबत हा त्यांचा पहिला चित्रपट होता, असे सांगितले. चित्रपटाचे पोस्टर आणि अभिषेक-ऐश्वर्यासोबत स्टेज शोच्या परफॉर्मन्सचा फोटो शेअर करुन त्यांनी लिहिले होते, "15 वर्षे ... "बंटी और बबली"... अभिषेकसोबतचा माझा पहिला चित्रपट... खूप मजेदार अनुभव… आणि ती काय टीम होती… आणि ‘कजरारे’… हा आमच्या सर्व स्टेज शोमध्ये ते असायचे.

बातम्या आणखी आहेत...