आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमर सिंह यांना झाला होता पश्चाताप:5 महिन्यांपूर्वी अमर सिंह यांनी अमिताभ यांना म्हटले होते- मी जीवन आणि मृत्यूचा सामना करत आहे, अमितजी आणि त्यांच्या कुटुंबाकडे माफी मागतो

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमर सिंह आणि जया बच्चन यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे हे दोन्ही कुटुंब दुरावले होते.

समाजवादी पक्षाचे माजी नेते आणि राज्यसभा खासदार अमर सिंह यांचा दीर्घ आजाराने मृत्यू झालाय. गेल्या जवळपास सहा महिन्यांपासून ते आजारी होते. काही महिन्यांपूर्वी आजारी असलेल्या अमर सिंह यांनी उपचारासाठी सिंगापूर गाठले होते. सिंगापूरच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. येथेच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. एक काळ असा होता जेव्हा अमर सिंह अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातीलच एक भाग होते. मात्र नंतर एक वादाची ठिणगी पडली आणि त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. पाच महिन्यांपूर्वी 64 वर्षीय अमर सिंह यांनी आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सोशल मीडियावरून अमिताभ बच्चन आणि कुटुंबीयांची माफी मागितली होती, त्यामुळे ते चर्चेत आले होते.

  • अमर सिंह यांनी ट्विट करुन मागितली होती माफी

अमर सिंह यांनी ट्विरवर लिहिले होते, 'आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी आहे आणि याच निमित्ताने मला अमिताभ बच्चन यांच्याकडून एक मॅसेज मिळाला. आज आयुष्याच्या या वळणावर जेव्हा मी जीवन आणि मृत्यूचा सामना करत आहे, मी अमितजी आणि त्यांच्या कुटुंबाकडे आपल्या टिप्पणीसाठी माफी मागतो. ईश्वर त्यांचे भले करो', असे ट्विट अमर सिंह यांनी केले होते.

ते पुढे म्हणाले होते, 'आजच्याच दिवशी माझे वडील स्वर्गवासी झाले होते. गेल्या दशकाभरापासून या तारखेला मला अमित बच्चन यांच्याकडून संदेश मिळतो. जेव्हा दोन व्यक्तींमध्ये अधिक स्नेह असतो आणि त्यात काही कमी-अधिक अपेक्षा किंवा उपेक्षा होते, तेव्हा ते संबंध अधिक तीव्रतेने बिघडतात. संबंध जेवढे जवळचे असतात, तेवढेच ते संबंध तुटण्याचा त्रास जास्त होतो.'

  • जया बच्चन यांच्यासोबत झालेल्या वादामुळे आला होता दुरावा

एका वादामुळे सिंह आणि बच्चन यांच्यात दरी निर्माण झाली होती. अमर सिंह यांनीच एका मुलाखतीत या वादाविषयी सांगितले होते. 2012 मध्ये अनिल अंबानी यांच्या घरी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अमर सिंह आणि जया बच्चन यांच्यात वाद झाला होता. जया बच्चन यांच्यासोबत झालेल्या वादात अमिताभ यांनी आपली बाजू घ्यावी, असे अमर सिंह यांना वाटत होते. मात्र अमिताभ यांनी जया यांची बाजू घेतली होती. ही गोष्ट अमर सिंह यांना खटकली होती. त्यामुळे नाराज झालेले अमर सिंह वारंवार अमिताभ यांच्या कुटुंबावर तोंडसुख घेऊ लागले होते. बच्चन कुटुंबात वाद असल्याचे, अमिताभ अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे ते उघडपणे बोलू लागले होते.

बातम्या आणखी आहेत...