आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडच्या आठवणींमध्ये अमर सिंह:श्रीदेवीच्या निधनानंतर ढसाढसा रडले होते अमर सिंह, म्हणाले होते - माझी आणि बोनीची चुक शाप बनली

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईतील एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडाल्यामुळे श्रीदेवीचा मृत्यू झाला होता, ती तेथे एका लग्नसमारंभासाठी गेली होती.
  • अमर सिंह म्हणाले होते की, त्यांचे श्रीदेवीशी इतके जवळचे नाते होते की, ती बोनी कपूर यांचे म्हणणे एकदा टाळू शकले, परंतु त्यांचे म्हणणे कधीही टाळत नव्हती.

समाजवादी पक्षाचे माजी नेते आणि राज्यसभा खासदार अमर सिंह यांचा दीर्घ आजाराने मृत्यू झालाय. गेल्या जवळपास सहा महिन्यांपासून ते आजारी होते. काही महिन्यांपूर्वी आजारी असलेल्या अमर सिंह यांनी उपचारासाठी सिंगापूर गाठले होते. सिंगापूरच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. येथेच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बॉलिवूडमधील अनेक सेलेब्रिटींशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. चित्रपट निर्माते बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्याबरोबरही त्यांची चांगली मैत्री होती. जेव्हा श्रीदेवीचे निधन झाले होते, तेव्हा ते ढसाढसा रडले होते. इतकेच नाही तर यासाठी त्यांनी स्वतःला आणि बोनीला दोषी ठरवले होते.

  • अमर सिंह म्हणाले होते- आमची चूक शाप ठरली

24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईतील एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडाल्यामुळे श्रीदेवीचे निधन झाले होते. यानंतर एका बातचितमध्ये अमर सिंह यांनी सांगितले होते की, या अपघाताच्या काही काळापूर्वीपर्यंत ते श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्यासोबत होतो. ते देखील बोनी कपूरचा भाचा मोहित मारवाहच्या लग्नात सहभाी होण्यासाठी दुबईला गेले होते. त्यांना त्यानंतर लगेचच उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात सहभागी व्हायचे होते, त्यामुळे लग्नाला हजेरी लावून ते आणि बोनी दुबईहून भारतात आले आणि श्रीदेवी तेथे एकटीच थांबली होती.

अमर सिंह म्हणाले होते, "ही चूक आमच्यासाठी शाप ठरली. आम्ही तिथे दुबईमध्ये हजर असतो तर हा अपघात टाळता आला असता. आम्ही त्यांना तिथे एकटे सोडले, ही आमची चूक होती", अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.

  • बोनी यांनी पहिला फोन अमर सिंह यांना केला होता?

अमर सिंह यांनी एका टीव्ही मुलाखतीत असा दावाही केला होता की, बोनी कपूर यांनी श्रीदेवीच्या मृत्यूबद्दल सर्वप्रथम त्यांना माहिती दिली होती. ते म्हणाले होते, "घटनेच्या रात्री बोनी यांनी मला फोन करून सांगितले की श्रीदेवी आता आपल्यात नाही. बहुधा पहिला फोन त्यांनी मलाच केला होता, असे त्यांनी सांगितले होते. रिपोर्टमध्ये असा दावाही करण्यात आला होता की, बोनी यांनी मध्यरात्री पहिल्यांदा अमर सिंह यांना मोबाइलवर फोन केला होता. पण फोन सायलंट होता. म्हणून त्यांचे बोलणे होऊ शकले नव्हते. त्यानंतर बोनी यांनी लँडलाइनवर फोन केला आणि त्यांना श्रीदेवीच्या निधनाची बातमी दिली होती.

  • श्रीदेवी अमर सिंह यांचे म्हणणे कधीच टाळत नव्हती?

अमर सिंह यांनी असेही म्हटले होते की, श्रीदेवीशी त्यांचे इतके जवळचे नाते होते की, ती एकदा बोनी कपूर यांचे म्हणणे टाळायची पण आपला शब्द कधीही खाली पडू देत नव्हती. त्यांच्या म्हणण्यानुसार, एकदा श्रीदेवी यांनी जिद्द पकडली होती की, जोवर अमर सिंह आपला चित्रपट बघणार नाही, तोवर तो प्रदर्शित केला जाणार नाही. सिंह म्हणाले होते की, श्रीदेवी त्यांच्या मुलीच्या खूप जवळ होती. जेव्हा श्रीदेवीचे निधन झाले होते, तेव्हा त्यांची मुलगी खूप खचली होती.

बातम्या आणखी आहेत...