आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तांडव' वाद:UP पोलिसांची टीम मुंबईत दाखल, वेब सीरिजचे निर्माता, दिग्दर्शक, लेखक आणि अ‍ॅमेझॉनच्या अधिका-यांची करणार चौकशी

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लखनौ पोलिसांची एक टीम मुंबईत दाखल झाली आहे.

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झालेल्या ‘तांडव’ या वेब सीरिजविरोधात लखनौच्या हजरतगंज कोतवाली येथे एफआयआर दाखल झाल्यानंतर तेथील पोलिसांची एक टीम मुंबईत दाखल झाली आहे. ते आज अ‍ॅमेझॉन प्राइम इंडियाच्या ओरिजिनल कंटेंट हेडसह मालिकेचे दिग्दर्शक, निर्मातो आणि लेखक यांची चौकशी करणार आहेत. या टीमचे नेतृत्त्व लखनौच्या हजरतगंज पोलिस स्टेशनचे इंस्पेक्टर अनिल सिंह करत आहेत. या वेब सीरिजमध्ये हिंदू विरोधी कंटेंट असल्याचा आणि हिंदू देवी देवतांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, हा वाद बघता मुंबईतील अ‍ॅमेझॉनच्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलिस कारवाई करू शकतात
पोलिस वेब सीरिज 'तांडव'चे दिग्दर्शक अली अब्बास, निर्माता हिमांशु कृष्ण मेहरा, लेखक गौरव सोलंकी आणि अ‍ॅमेझॉनच्या अधिकारी अपर्णा पुरोहित यांची चौकशी करणार आहेत . इतकेच नाही तर सीरिजमधील आक्षेपार्ह दृश्यात ज्या कलाकारांनी काम केले आहे, त्यांच्या त्यांच्याविरूद्धही पोलिस कारवाई करू शकतात.

कायद्यानुसार कारवाई केली जाईल: अनिल देशमुख
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याविषयावर बोलताना बुधवारी सांगितले की, आम्हाला 'तांडव' या वेब सीरिजबद्दल तक्रार मिळाली आहे, कायद्यानुसार कारवाई केली जाईल. ओटीटी (ओव्हर-द-टॉप) प्लॅटफॉर्मबाबत केंद्र सरकारने कायदा आणला पाहिजे.

दिग्दर्शकाने माफी मागितली
तांडवच्या वादाच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी सोमवारी सोशल मीडियावर माफी मागितली. 'आम्ही तांडवच्या दर्शकांचे प्रतिक्रिया बारकाईने पाहत आहोत आणि आज आम्हाला सूचना आणि प्रसारण मंत्रालयने सांगितले की, एक याचिका दाखल झाली आहे. आम्हाला समजले की, वेब सीरीजच्या काही कटेंटमुळे काही जणांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ही गोष्ट संपूर्णपणे काल्पनिक आहे आणि कोणत्याही घटनेची याची तुलना फक्त एक योगायोग आहे. आमचा कोणतीही व्यक्ती, जाती, समाज, धर्म किंवा धार्मिक विश्वासांना ठेस पोहचवणे किंवा संस्था, राजकीय पक्ष आणि जिवंत-मृत व्यक्तीचा अपमान करण्याचा उद्देश नाही. तांडवचे कलाकार आणि क्रु लोकांच्या भावनांचा आदर करत, माफी मागतो,' असे जफर यांनी माफीनाम्यात म्हटले आहे.

मुख्यमंत्री योगी यांचे माध्यम सल्लागार यांनी दिला इशारा
लखनौ येथे एफआयआर दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे माध्यम सल्लागार शलाभ मणि त्रिपाठी यांनी आरोपींना इशारा दिला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे, 'लोकांच्या भावना दुखावणे कधीही सहन केले जाणार नाही. लवकरच 'तांडव' वादाशी निगडीत आरोपींना अटक केली जाईल.'

द्वेष पसरवण्याचा आरोप
लखनौत दाखल झालेल्या एफआयआरनुसार, 16 जानेवारी रोजी रिलीज झालेल्या या वेब सीरिजविरोधात सोशल मीडियावर यूजर्सनी रोष व्यक्त केला आहे. नेटक-यांनी सीरिजमधील वादग्रस्त दृश्य सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. पहिल्या एपिसोडमध्ये 17 मिनिटांच्या क्लिपमध्ये कलाकारांनी हिंदू देवतांची भूमिका साकारत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह संवाद म्हटले आहे. यामुळे हिंदूंच्या धार्मिक
भावना दुखावल्या गेल्याचे म्हटले आहे. संपूर्ण सीरिजमध्ये पंतप्रधानांसारख्या सन्माननीय पदावर असणा-या व्यक्तीला अत्यंत अपमानास्पद पद्धतीने दाखवले गेले आहे.

राम कदम यांनी पोलिस स्टेशनबाहेर केले होते उपोषण

दरम्यान, तांडवविरोधातील वाद सध्या वाढत आहे. मंगळवारी भाजप नेते राम कदम आपल्या कार्यकर्त्यांसह घाटकोपर पोलिस स्टेशनसमोर उपोषणाला बसले होते. मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल करुन न घेतल्याने त्यांनी हे उपोषण केले होते. राम कदम यांचा आरोप आहे की, ते मागील तीन दिवसांपासून मुंबई पोलिसांना वेब सीरिजविरोधात तक्रार नोंदवून घेण्यास सांगत आहेत, परंतु महाराष्ट्र सरकारच्या दबावामुळे पोलिस एफआयआर नोंदवत नाहीयेत.

बातम्या आणखी आहेत...