आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉनी डेप मानहानी खटला:अंबर हर्ड 80 कोटींचा दंड भरु शकत नाही, अंबरचे वकील ऐलेन ब्रॅडहॉफ्टचा खुलासा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंबर 10 मिलियन डॉलर देऊ शकत नाही

अंबर हर्ड आणि जॉनी डेप प्रकरणाचा बुधवारी निकाल आला. ज्यामध्ये दोघेही दोषी आढळले आहेत, पण अंबरला अधिक दोषी मानून न्यायालयाने तिला डेपला 15 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 116 कोटी देण्याचे आदेश दिले आहेत. अलीकडेच, अंबरच्या वकिलाने सांगितले की, अंबर तिचा पुर्वाश्रमीचा पती डेपला 10 मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 80 कोटी देऊ शकत नाही.

अंबर 10 मिलियन डॉलर देऊ शकत नाही
एका मीडिया मुलाखतीत, अंबरचे वकील ऐलेन ब्रेडहॉफ्ट यांनी सांगितले की, "अंबरला कोर्टात वाईट ठरवण्यात आले होते. या कोर्टात अशा अनेक गोष्टींना परवानगी होती ज्या करायला नको होत्या आणि यामुळे ज्युरी गोंधळात पडले. आम्हाला त्यांना यूके कोर्टाच्या निर्णयाबद्दल सांगण्याची परवानगी नव्हती. यूकेमध्ये जो निकाल आला तो 2 नोव्हेंबर 2020 रोजी स्थगित करण्यात आला होता." जेव्हा ऐलेन यांना विचारण्यात आले की अंबर जॉनीला एवढे पैसे देण्यास सक्षम आहे का, तेव्हा ऐलेनने उत्तर दिले, "अजिबात नाही. तिच्याकडे एवढी मोठी रक्कम नाही."

खटल्यातील पुरावे दडपले गेले - अंबरच्या वकिलांचा आरोप
2020 च्या यूके प्रकरणाबद्दल बोलताना वकील म्हणाले, "तिथल्या कोर्टाला असे आढळून आले की डेपवर घरगुती हिंसाचारासह कमीत कमी 12 कलम लावायला हवे होते, ज्यात अंबरवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाची समावेश आहे. परंतु आम्हाला ते ज्युरीला सांगण्याची परवानगी नव्हती. यातून डेपची टीम काय शिकली? तर अंबरला कोर्टात चुकीचे सिद्ध करणे आणि पुरावे दडपणे. आमच्याकडे बरेच पुरावे होते जे या प्रकरणात दडपण्यात आले, ते ब्रिटनच्या प्रकरणात होते. जेव्हा यूकेमध्ये या खटल्याचा निकाल आला तेव्हा, अंबर तो खटला जिंकली होती," असे वकील म्हणाले.

अंबरने डेपवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला
अंबर हर्डने डेपवर घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला होता. त्यानंतर जॉनीने हर्ड हिच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला. यात जॉनी डेपच्या बाजूने निकाल लागला. या निकालावर प्रतिक्रिया देताना अंबर हर्डने हा निर्णय महिलांसाठी धक्का असल्याचे म्हणत न्यायालयाच्या निर्णयाला निराशाजनक म्हटले. या निर्णयामुळे मी निराश असल्याचे तिने सांगितले. या निकालावर प्रतिक्रिया देताना हर्ड पुढे म्हणाली, आज मला जी निराशा वाटतेय ती शब्दांपलीकडची आहे. माझ्या पुर्वाश्रमीच्या पतीच्या अमर्याद शक्ती, प्रभाव आणि प्रसिद्धीचा सामना करण्यासाठी इतके पुरावे पुरेसे नव्हते याचे मला दु:ख आहे. दुसरीकडे निकाल आल्यानंतर डेप म्हणाला की, ज्युरीने मला माझे आयुष्य परत दिले आहे. सत्य कधीच हरत नाही. माझे नवीन आयुष्य सुरू होणार आहे. निकाल काहीही लागला असता, पण सत्य बाहेर आणणे हा या खटल्याचा उद्देश होता.

2015 मध्ये झाले होते लग्न
अंबर हर्ड आणि जॉनी डेप यांनी 2015 मध्ये लग्न केले होते. मे 2016 मध्ये, हर्डने डेपवर घरगुती हिंसाचाराचा आरोप लावला होता आणि 2017 मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला. हर्डने डेपवर बळजबरीने सेक्स आणि अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप केला होता.

बातम्या आणखी आहेत...