आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री अमिषा पटेल आणि पाकिस्तानी अभिनेता इमरान अब्बास यांच्या अफेअरच्या बातम्या समोर येत आहेत. झाले असे की, अमिषा आणि अब्बास यांची नुकतीच बहरीनमध्ये एका कार्यक्रमात भेट झाली होती. यादरम्यान, दोघांनी एक मजेदार व्हिडिओ शूट केला आणि तो इंस्टाग्रामवर शेअर केला, त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले. आता नुकतीच अमिषाने यावर प्रतिक्रिया देत या व्हिडिओचे संपूर्ण सत्य सांगितले आहे.
अमिषा म्हणाली असे विचारणेच मुर्खपणाचे आहे
अमिषा म्हणाली, 'मीही हे रिपोर्ट्स वाचले आहेत आणि त्यावर मला खूप हसूही आले. हे संपूर्ण प्रकरण अतिशय मूर्खपणाचे आहे. मी खूप वर्षांनी माझ्या मित्राला भेटले आणि ती फक्त एक भेट होती,' असे स्पष्टीकरण अमिषाने दिले आहे.
अमिषाने सांगितले व्हिडिओमागचे सत्य
याबाबत अधिक बोलताना अमिषा म्हणाली, 'अब्बासला माझ्या चित्रपटातील हे गाणे खूप आवडते. यासोबतच हे माझेही खूप आवडते गाणे आहे. त्यामुळे आम्ही लगेच हा व्हिडिओ बनवला, जो आमच्या मित्रांनी रेकॉर्ड केला होता. व्हिडिओ खूप चांगला झाला, म्हणून आम्ही तो पोस्ट केला. हे सर्व नियोजनानुसार नव्हते.'
अमिषा-अब्बास कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखतात
अमिषा म्हणते, 'मी अमेरिकेत शिकत असताना माझी आणि अब्बासची मैत्री झाली. तेव्हापासून मी बहुतांश पाकिस्तानी मित्रांच्या संपर्कात आहे. त्यांचे भारतावर खूप प्रेम आहे. अब्बास देखील तिथल्या फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहे आणि त्यामुळे आमच्याकडे बोलण्यासाठी बरेच विषय आहेत.'
इमरान अब्बासने बॉलिवूडमध्येही केले आहे काम
अमिषा पटेलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'गदर 2' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सनी देओलही दिसणार आहे. त्याचबरोबर इमरानने अनेक पाकिस्तानी शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने विक्रम भट्टच्या 'क्रिएचर 3D' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.