आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री कायद्याच्या कचाट्यात:अमिषा पटेल समन्स बजावल्यानंतरही कोर्टात गैरहजर, रांची सिव्हिल कोर्टाने जारी केले वॉरंट

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'गदर' फेम अभिनेत्री अमिषा पटेल कायदेशीत अडचणीत सापडली आहे. तिच्याविरोधात न्यायालयाने वॉरंट जारी केले आहे. झारखंडमधील रांची दिवाणी न्यायालयाने अमिषा आणि तिचा व्यावसायिक भागीदार क्रुणाल यांच्याविरुद्ध चेक बाऊन्स, फसवणूक आणि धमकावणे या प्रकरणी वॉरंट जारी केले आहे. यापूर्वी न्यायालयाने तिला समन्स बजावले होते, मात्र ती न्यायालयात गैरहजर राहिली. त्यानंतर तिच्याविरोधात न्यायालयाकडून वॉरंट जारी करण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 एप्रिल रोजी होणार आहे.

अजय कुमार आणि अमिषा पटेल यांचे जुने छायाचित्र
अजय कुमार आणि अमिषा पटेल यांचे जुने छायाचित्र

चित्रपटाच्या नावावर अमिषाने उकळले पैसे
‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, अजय कुमार सिंह यांनी 2018 मध्ये अमिषा पटेलविरोधात गुन्हा दाखल केला होता. तक्रारीतील आरोपानुसार, अमिषा पटेलने चित्रपट बनवण्याच्या नावाखाली त्याच्याकडून अडीच कोटी रुपये घेतले होते, पण हा चित्रपट बनू शकला नाही आणि अमिषाने पैसेही परत केले नाहीत.

अजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार, अमिषा पटेल आणि तिचा भागीदार क्रुणालने चित्रपट पूर्ण झाल्यानंतर व्याजासह पैसे परत करणार असल्याचे सांगितले होते. ‘देसी मॅजिक’ नावाच्या चित्रपटाचे शूटिंग 2013 मध्ये सुरू झाले होते. मात्र, हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. तसेच चित्रपट निर्मात्याने अमिषा पटेलकडे पैसे मागितल्यावर तिने परत केले नाहीत. नंतर तिने ऑक्टोबर 2018 मध्ये त्यांना 2.5 कोटी आणि 50 लाख रुपयांचे दोन चेक दिले होते, पण ते बाऊन्स झाले होते.

अमिषाने चित्रपटात पैसे गुंतवण्याची ऑफर दिली होती
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजय सिंह बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील बखोरापूर येथील रहिवासी आहेत. त्यांना बॉलिवूडमध्ये निर्माता म्हणून नाव कमावायचे होते. 2017 मध्ये हरमू हाऊसिंग कॉलनीमध्ये डिजिटल इंडियावर एक कार्यक्रम झाला होता. याच कार्यक्रमात अमिषा आणि अजय सिंह पाहुणे म्हणून सहभागी झाले होते.

कार्यक्रमादरम्यान, अमिषाने अजय यांना 'देसी मॅजिक' चित्रपटात गुंतवणूक करण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर त्यांनी अमिषाला 2.5 कोटी रुपयांचा चेक दिला होता.