आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पा शेट्टीची मन की बात:पती राज कुंद्राच्या अटकेदरम्यान शिल्पा शेट्टी म्हणाली, 'आयुष्यात पॉज बटण दाबता येत नाही, काही गोष्टी वेळेवर सोडल्या पाहिजेत'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिल्पाने सोशल मीडियावर एका पुस्तकातील पॉझिटिव्ह कोट शेअर केला आहे.

पती राज कुंद्राच्या अटकेदरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टी स्वतःला स्ट्राँग ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तिने सोशल मीडियावर एका पुस्तकातील पॉझिटिव्ह कोट शेअर केला आहे.

शिल्पाने लिहिले, "आपण आपल्या आयुष्यात पॉज बटण दाबू शकत नाही. आपण आपल्या कठीण काळात असो किंवा आपल्या चांगल्या काळात, प्रत्येक दिवस मोजला जातो. कधीकधी आपल्याला तणाव असताना काही गोष्टी वेळेवर सोडाव्या लागतात. काहीही घडले तरी आपले आयुष्य चालत राहते. आपल्याकडे फक्त एकच वेळ आहे, बाकी काही नाही. त्यामुळे प्रत्येक क्षण जगायला हवा, जेणेकरून आपल्या हातातून वेळ निघून जाणार नाही."

शिल्पा पुन्हा शूटिंगवर परतली
19 जुलै रोजी राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाने सुपर डान्सर चॅप्टर 4 च्या शूटिंगमधून ब्रेक घेतला होता. जवळपास महिनाभर ती शूटिंगला हजर नव्हती. पण 17 ऑगस्ट रोजी तिने रिअॅलिटी शोच्या शूटिंगला पुन्हा सुरुवात केली आहे. या शोमध्ये ती परीक्षकाच्या भूमिकेत दिसते.

पॉर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेल्या राज कुंद्राला सध्या मुंबई उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. 19 जुलै रोजी या प्रकरणी राज कुंद्रा, रायन थोरपे यांच्यासह 11 जणांना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात राज कुंद्राच्या अडचणी आधीच वाढल्या आहेत. गुन्हे शाखेने सांगितल्यानुसार राजच्या 4 कर्मचाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध साक्ष देण्यास सहमती दर्शवली आहे.

पॉर्न चित्रपटातून एका दिवसाला 10 लाखांहून अधिक कमाई करत असे राज
पॉर्न फिल्म रॅकेटमध्ये राजच्या अटकेनंतर राजने एका दिवसात अनेक वेळा 10 लाखांहून अधिक कमाई केल्याचे तपासात समोर आले आहे. पॉर्न फिल्म्स बनवणे आणि ऑनलाइन अॅपद्वारे ते पब्लिश केल्याप्रकरणी सध्या राज कुंद्रा तुरुंगात आहे. त्याच्या बँक खात्याचे काही तपशील सार्वजनिक केले गेले आहेत, ज्यावरून कुंद्राची कंपनी एका दिवसात 50 हजार ते 10 लाख रुपये कमवत असल्याचे समोर आले होते.

बातम्या आणखी आहेत...