आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Amidst The Arrest Of Husband Raj Kundra, Shilpa Shetty Said, 'I Made A Mistake But It Is Okay, I Will Keep Making Mistakes, I Will Forgive Myself'

हाल-ए-दिल:पती राज कुंद्राच्या अटकेदरम्यान शिल्पा शेट्टी म्हणाली -  'मी चूक केली पण ठीक आहे... मी स्वत:ला माफ करणार आणि झालेल्या चुकांमधूनच शिकणार'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहेत ज्यात पुस्तकाच्या पानाचे काही फोटो आहेत.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला अश्लिल फिल्म बनवणे आणि ते पेड अॅपवर रिलीज केल्याप्रकरणी 19 जुलै रोजी अटक झाली. दीड महिन्यानंतरही अद्याप राजला जामीन मिळू शकलेला नाही. दरम्यान शिल्पा महिन्याभरानंतर पुन्हा एकदा सुपर डान्सर या डान्स शोमध्ये परतली आहे. शिवाय ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर देखील सक्रीय झाली आहे. शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात पुस्तकाच्या पानाचे काही फोटो आहेत. त्यामध्ये सोफी लॉरेन यांचा कोट आहे. आयुष्यातील चुकांबद्दल त्यात लिहिले आहे.

शिल्पा म्हणाली - 'मी चूक केली आहे पण ठीक आहे...'
या पोस्टमध्ये लिहिले आहे, 'आयुष्यात घडणा-या चुकांचे परिणाम जीवनावर उमटत असतात. आयुष्यात काही चुका केल्याशिवाय ते रंजक होऊ शकत नाही. फक्त एकच म्हणजे त्या चुका धोकादायक असू नये. मात्र चुका या होतातच. ज्या गोष्टींना आपण विसरु पाहतो अशा गोष्टींमध्ये आपल्या चुका देखील असतात. परंतु एक आव्हानात्मक, रंजक अनुभव म्हणूनसुद्धा त्यांच्याकडे पाहिले जाऊ शकते. कारण त्यामधून आपण बरेच काही शिकू शकतो.' 'मी चुका करणार. मी स्वत:ला माफ करणार आणि झालेल्या चुकांमधूनच शिकणार', अशी ओळ या पोस्टच्या शेवटी आहे. शिल्पाने शेवटी एक स्टिकरही शेअर केला आहे. त्या स्टिकरवर लिहिले आहे, 'मी चूक केली आहे परंतु ठीक आहे ना...' पण शिल्पा आपल्या कोणत्या चुकांबद्दल बोलतेय, हे येथे स्पष्ट झालेले नाही.

शिल्पा शेट्टी म्हणाली, 'आयुष्यात पॉज बटण दाबता येत नाही, काही गोष्टी वेळेवर सोडल्या पाहिजेत'

शिल्पाने बुधवारीदेखील एक कोट शेअर केला होता. त्यात लिहिले होते, "आपण आपल्या आयुष्यात पॉज बटण दाबू शकत नाही. आपण आपल्या कठीण काळात असो किंवा आपल्या चांगल्या काळात, प्रत्येक दिवस मोजला जातो. कधीकधी आपल्याला तणाव असताना काही गोष्टी वेळेवर सोडाव्या लागतात. काहीही घडले तरी आपले आयुष्य चालत राहते. आपल्याकडे फक्त एकच वेळ आहे, बाकी काही नाही. त्यामुळे प्रत्येक क्षण जगायला हवा, जेणेकरून आपल्या हातातून वेळ निघून जाणार नाही."

शिल्पा पुन्हा शूटिंगवर परतली
19 जुलै रोजी राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाने सुपर डान्सर चॅप्टर 4 च्या शूटिंगमधून ब्रेक घेतला होता. जवळपास महिनाभर ती शूटिंगला हजर नव्हती. पण 17 ऑगस्ट रोजी तिने रिअॅलिटी शोच्या शूटिंगला पुन्हा सुरुवात केली आहे. या शोमध्ये ती परीक्षकाच्या भूमिकेत आहे.

पॉर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेल्या राज कुंद्राला सध्या मुंबई उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. 19 जुलै रोजी या प्रकरणी राज कुंद्रा, रायन थोरपे यांच्यासह 11 जणांना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात राज कुंद्राच्या अडचणी आधीच वाढल्या आहेत. गुन्हे शाखेने सांगितल्यानुसार राजच्या 4 कर्मचाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध साक्ष देण्यास सहमती दर्शवली आहे.

पॉर्न चित्रपटातून एका दिवसाला 10 लाखांहून अधिक कमाई करत असे राज
पॉर्न फिल्म रॅकेटमध्ये राजच्या अटकेनंतर राजने एका दिवसात अनेक वेळा 10 लाखांहून अधिक कमाई केल्याचे तपासात समोर आले आहे. पॉर्न फिल्म्स बनवणे आणि ऑनलाइन अॅपद्वारे ते पब्लिश केल्याप्रकरणी सध्या राज कुंद्रा तुरुंगात आहे. त्याच्या बँक खात्याचे काही तपशील सार्वजनिक केले गेले आहेत, ज्यावरून कुंद्राची कंपनी एका दिवसात 50 हजार ते 10 लाख रुपये कमवत असल्याचे समोर आले होते.

बातम्या आणखी आहेत...