आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिर खान पुन्हा वादात:तुर्कीच्या राष्ट्रपतींच्या पत्नीला भेटल्यानंतर वादात अडकला आमिर खान; सोशल मीडिया यूजर्सनी देशद्रोही घोषित केले, भाजप - काँग्रेससुद्धा आमनेसामने

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आगामी चित्रपटाच्या शुटींगसाठी आमिर खान तुर्कीत दाखल झाला आहे

'लालसिंग चड्ढा' या आगामी चित्रपटासाठी तुर्कीला गेलेला आमिर खान वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटाच्या शूटिंग पूर्वी त्याने तुर्कीचे राष्ट्रपती रजब तैय्यब अर्दोआन यांची पत्नी अमीनची भेट घेतली. 15 ऑगस्ट रोजी झालेल्या या भेटीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एकीकडे सोशल मीडिया युजर्स आमिरला देशविरोधी म्हणत आहेत, तर या प्रकरणावरून भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आले आहेत.

'आमिर तुर्कीत शुटींग करणार जाणून आनंद झाला'

आमिरशी भेट झाल्यानंतर अमीनने लिहिले, " जगप्रसिद्ध भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आमिर खान यांना इस्तंबूलमध्ये भेटून आनंद झाला. मला जाणून आनंद होत आहे की, आमिरने आपला आगामी सिनेमा 'लालसिंग चड्ढा' चे शुटींग तुर्कीच्या विविध भागात करण्याचे ठरवले आहे. मी त्यासाठी तयार आहे."

या भेटीवरून वादाचे कारण काय?

अर्दोआन नेहमीच भारत विरोधी विधानाबाबत चर्चेत असतात. जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तानच्या प्रकरणांचा उल्लेख केला जातो तेव्हा अर्दोआन पाकिस्तानची बाजू घेताना दिसून येतात. मागील वर्षी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटल्यानंतर त्यांनी या कारवाईचा विरोध केला होता.

गेल्या महिन्यात बकरी ईदच्या निमित्ताने अर्दोआन यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्याशी चर्चा केली. सोबतच काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला पाठिंबा देतील असे आश्वासनही दिले होते. तुर्की देखील भारतातील कट्टर इस्लामिक संस्थांना वित्तपुरवठा करते, असा दावाही काही रिपोर्ट्समध्ये केला आहे

.

लोकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली

ट्विटरवर एका युजरने लिहिले की, आमिरने भारताचे मित्र इज्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांची भेट घेण्यास नकार दिला होता, पण पाकिस्तानचा मित्र तुर्कीच्या पहिल्या महिलेला भेटण्यात त्याला काहीच अडचण झाली नाही.

भाजपचा विरोध, काँग्रेसचे समर्थन

आमिरच्या तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीशी झालेल्या भेटील भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद यासारख्या संस्था विरोध करीत आहेत. तर काँग्रेसने आमिरचे समर्थन केले आहे. काँग्रेस नेता अभिषेक मनु सिंघवीने ट्विट केले की, "आमिर खान स्वतंत्र नागरिक आहे. तो भारताचा राजदूत, खासदार किंवा सरकारी अधिकारी नाही. त्यामुळे त्याला पाहिजे त्यास भेटता येते." मात्र, ते देखील तुर्कीला विरोध करतात, हे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले

सिंघवी यांच्या ट्विटवर भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की आमिरला काहीही करण्यास पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण देशाप्रती त्याची काही जबाबदारी आहे की नाही? आमिर जो काही आहे, ते भारतीयांच्या प्रेमापोटी आहे. तर तुर्की नेहमीच भारताविरोधात बोलत आला आहे. मला खात्री आहे की आमिरच्या हृदयात भारत राहतो, परंतु तो तुर्कीच्या पहिल्या महिलेला कसा भेटू शकतो, तेच तुर्की आहे, ज्याने दिल्लीतील दंगलीच्या वेळी म्हटले होते की, भारतात मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...