आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोटल रिकॉल:इंडस्ट्रीत चार वाईट लोक असतील, तर चाळीस चांगले लोकही आहेत : अमित साध

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ग्लॅडिएटरची भूमिका मिळाली, तर ती साकारण्याचा प्रयत्न करणार

अमित साध ‘ब्रीद सीझन 2’ मध्ये पुन्हा झळकणार आहे. दिव्य मराठीसोबत झालेल्या विशेष चर्चेत त्याने वेबसिरीजशिवाय घराणेशाही, गटबाजी आणि लॉकडाऊन या विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या....

एक आऊटसायडर या नात्याने इंडस्ट्रीत सुरू असलेल्या घराणेशाही आणि गटबाजीबद्दल काय सांगाल?
इंडस्ट्रीमध्ये जर चार नालायक लोक असतील तर चाळीस चांगले लोकही आहेत एवढेच मी म्हणेन. फेवरेटिज्म तर घरीही केले जाते. मी फक्त प्रामाणिकपणे काम कसे करायचे याचा विचार करत असतो, पण काम मिळाले नाहीतर भांडी घासायचीही माझी तयारी आहे. मी चित्रपटसृष्टीत येण्याअगोदर एका हॉटेलमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होतो. १६ वर्षांच्या वयापासूनच स्वतः जगायला शिकलो. आता तर मी ४१ वर्षांचा झालो आहे, खूप काही करू शकतो.

या लॉकडाऊनमध्ये स्वतःच्या आयुष्यात काय बदल केले?
मी मुक्तेश्वरमध्ये असल्यामुळे लॉकडाऊनचा वेळ कुटुंबासोबत घालवता आला नाही. मी जंगलात आणि डोंगरांवर रोज १० किलोमीटर फिरत होतो. या लॉकडाऊनमध्ये मी खूप महत्त्वाची गोष्ट शिकलो. आधी माझ्या आयुष्यात फक्त चित्रपटांना स्थान होते, सकाळ-संध्याकाळ-रात्री-खाताना-पिताना-झोपताना मी फक्त चित्रपटांबद्दल विचार करत होतो. पण या तीन महिन्यांच्या काळात मला ही जाणीव झाली, चित्रपट हा माझ्या आयुष्याचा एक छोटासा भाग आहे. चित्रपटाव्यतिरिक्त माझ्या आयुष्यात खूप गोष्टी आहेत, ज्याकडे मी दुर्लक्ष करत होतो.

ब्रीद 2 मध्ये तू कोणती भूमिका साकारली करतोय ?
पहिल्या सीझनमध्ये माझी भूमिका पोलिस अधिकाऱ्याची होती. ज्याच्या आयुष्यात खूप अडचणी होत्या. पण या सीझनमध्ये माझ्या अनेक रूप दाखवले जाईल. सीझन 2 मध्ये माझी भूमिका ही अधिक चांगली आहे. लेखकाने या वेळी माझा रोल एकदम दमदार आणि चांगला लिहिला आहे.

या वेळी तुझ्यासाठी चॅलेंजिंग पार्ट कोणता होता ?
ब्रीदच्या आधी माझे करिअर अधांतरी होते, पण पहिल्या सीझननंतर खूप प्रेम मिळाले. माझ्यासाठी हे खूप स्पेशल होते. मी त्यांच्यासमोर जो बेंचमार्क सेट केला, त्या उंचीपर्यंत पुन्हा पोहोचणे हेच माझ्यासाठी मोठे आव्हान आहे.

अभिषेकने या ओटीटी प्लॅटफॉर्ममधून डेब्यू केले आहे. त्यांच्यासोबत कामाचा अनुभव कसा होता?
अभिषेकसोबत काम करायचा अनुभव हा खूप मजेशीर होता. कारण, ते खूपच प्रेमळ आणि मायाळू आहेत. त्यांना चित्रपटांची खूप जाण आहे. ते अनुभवाने माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, पण त्यांनी कधीच दाखवून दिले नाही. माझ्यासोबत एक मित्र, मोठ्या भावांप्रमाणे ते सेटवर राहायचे. सेटवर आम्ही एकत्र क्रिकेटही खेळलो. मला कधीही चांगली कॉफी प्यायची इच्छा झाली तर मी त्यांच्याकडे जायचो.

अशी कोणती वेगळी भूमिका साकारायची तुझी इच्छा आहे का?
मी एक चित्रपट पाहिला होता ‘ग्लॅडिएटर’ आणि जर संधी मिळाली तर ती भूमिका करण्याचा प्रयत्न नक्की करेन.

बातम्या आणखी आहेत...