आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'सुल्तान' फेम अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा:37 वर्षीय अमित साध म्हणाला - 16 ते 18 वर्षांच्या वयात मी चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वीस वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर नैराश्य, चिडचिडेपणा, आत्महत्येचा विचार यापासून मुक्तता मिळाल्याचा खुलासा त्याने या मुलाखतीत केला आहे.

'का पो छे', 'सुल्तान' आणि 'गोल्ड' यासारख्या चित्रपटात झळकलेला अभिनेता अमित साधने किशोरवयात असताना चार वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मानसिक आरोग्याविषयी बोलताना त्याने हा धक्कादायक खुलासा केला आहे. 37 वर्षीय अमितने सांगितल्यानुसार, या विचारांमागे ठोस असे कुठलेही कारण नव्हते.

'मला फक्त आत्महत्या करायची होती'

मॅन एक्सपीशी झालेल्या चर्चेदरम्यान अमित साधने सांगितल्यानुसार, अचानक एक दिवस आपण आपले आयुष्य संपवून टाकावे, असे त्याच्या मनात आले होते. तो सांगतो, “१६ ते १८ वर्षांच्या वयात मी स्वत: चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. माझ्या डोक्यात सतत आत्महत्येचा विचार नव्हता, फक्त मला आत्महत्या करायची होती.''

तो पुढे सांगतो, ''काही योजना आखली नव्हती. अचानकच माझी जगण्याची इच्छा निघून जायची. जेव्हा चौथ्यांदा प्रयत्न केला, तेव्हा खरंच मनातून वाटले की आपण असे जगू शकत नाही. आपला शेवट असा असू नये. तेव्हापासून माझी मानसिकता बदलली. काहीही झाले तरी हार मानू नये, असे मनाशी पक्कं ठरवले आणि पुढचा प्रवास सुरू केला”, असे अमितने सांगितले.

इतकेच नाही तर जवळपास वीस वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर नैराश्य, चिडचिडेपणा, आत्महत्येचा विचार यापासून मुक्तता मिळाल्याचा खुलासा त्याने या मुलाखतीत केला आहे.

एका मोठ्या अभिनेत्याने मला वेडा ठरवले होते
आपल्या आयुष्यातील या कठीण काळाचा उल्लेख करताना अमित साध म्हणाला, "मला आठवतेय एका मोठ्या अभिनेत्याने माझ्या एक्स गर्लफ्रेंडला सांगितले होते की 'हा वेडा आहे, त्याला मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन जा.' मग दोन वर्षांनंतर जेव्हा मी त्या अभिनेत्याला भेटलो तेव्हा मी त्याला सांगितले की, 'सर, मी वेडा नाही."

अलीकडेच 'शकुंतला देवी'मध्ये झळकला होता

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे म्हणजे अमित साधचा शेवटचा चित्रपट 'शकुंतला देवी' हा होता. या चित्रपटात अमितसह विद्या बालन आणि सान्या मल्होत्रा ​​यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. हा चित्रपट यावर्षी जुलैमध्ये प्रदर्शित झाला होता. याशिवाय अमित यावर्षी 'ब्रीदः इंटू द शेडो' आणि 'अवरोध : द सीज विदइन' या दोन वेब सीरिजमध्ये दिसला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser