आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहांचा स्पेशल डायलॉग:अमित शहांनी तब्बल 13 वर्षांनी पत्नीसोबत बघितला चित्रपट, 'पृथ्वीराज' बघून बाहेर आल्यावर पत्नीला म्हणाले - 'चलिए हुकुम'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपट पाहिल्यानंतर म्हणाले - चित्रपट भारतीय संस्कृती दर्शवतो

अभिनेता अक्षय कुमार स्टारर 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटाचे बुधवारी स्पेशल स्क्रिनिंग होते. दिल्लीतील या स्क्रिनिंगला खास पाहुणे म्हणून गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. अमित शहा तब्बल 13 वर्षांनी पत्नी सोनलसोबत चित्रपट पाहायला आले होते. चित्रपट संपला आणि शहा पत्नीसोबत थिएटरबाहेर पडले. थिएटरबाहेर आल्यानंतर त्यांच्या पत्नी सोनल एकाच ठिकाणी थांबल्या... कदाचित त्यांना आता काय करावे हे कळले नसावे.

यादरम्यान अमित शहा यांचा खास अंदाज उपस्थितांना बघायला मिळाला. चित्रपटात ज्याप्रमाणे संवाद बोलले जातात त्याच अंदाजात शहा यांनी पत्नीला घरी चलण्याची विनंती केली. शहा आपल्या पत्नीला म्हणाले- चलिए हुकुम...

गृहमंत्री शहा यांनी चित्रपट पाहिल्यानंतर उपस्थितांना संबोधित केले.
गृहमंत्री शहा यांनी चित्रपट पाहिल्यानंतर उपस्थितांना संबोधित केले.

चित्रपट पाहिल्यानंतर म्हणाले - चित्रपट भारतीय संस्कृती दर्शवतो
चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या शहा यांनी सांगितले की, मी 13 वर्षांनंतर कुटुंबासह चित्रपट पाहत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर ते पुढे म्हणाले- अक्षय कुमार यांचा सम्राट पृथ्वीराज हा चित्रपट भारतीय संस्कृती दर्शवते, जी महिलांचा आदर करते आणि सशक्त करते. शहा पुढे म्हणाले की, 1947 मध्ये आपण स्वतंत्र झालो. मी खात्रीने सांगू शकतो की 2014 पासून भारतात सांस्कृतिक पुनर्जागरणाचे एक पर्व सुरू झाले आहे, जे भारताला पुन्हा एकदा आपण ज्या उंचीवर पोहोचलो होतो त्या शिखरावर नेईल.

'पृथ्वीराज' 3 जूनला प्रदर्शित होणार आहे
या चित्रपटात अक्षय कुमारने सम्राट पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारली आहे. मानुषी छिल्लरने सम्राट पृथ्वीराज यांच्या पत्नी महाराणी संयोगिताची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी हे असून त्यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. या चित्रपटात अक्षय-मानुषीशिवाय संजय दत्त, सोनू सूद, साक्षी तन्वर, आशुतोष राणा, ललित तिवारी आणि मानव विज हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत 3 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाशी संबंधित वाद
'पृथ्वीराज' चित्रपटाच्या शीर्षकावरुन करणी सेना आणि अखिल भारतीय वीर गुर्जर महासभेने निर्मात्यांना नोटीस पाठवली होती. ते म्हणाले होते की, पृथ्वीराज हे हिंदू सम्राट होते. त्यामुळे चित्रपटाच्या शीर्षकातही सम्राट हा शब्द जोडला जावा. जर शीर्षक बदलले नाही तर आम्ही हा चित्रपट राजस्थानमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. दरम्यान ओमान आणि कुवैतमध्येही या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. पण अद्याप सरकार आणि निर्मात्यांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...