आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पेशल स्क्रीनिंग:रिलीजच्या दोन दिवस आधी गृहमंत्री अमित शहा बघणार अक्षय कुमारचा 'पृथ्वीराज' हा चित्रपट, दिग्दर्शकाने दिली माहिती

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्क्रीनिंगशी संबंधित अधिक तपशील समोर आलेला नाही

अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित पृथ्वीराज हा चित्रपट येत्या 3 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. पण रिलीजपूर्वी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी आयोजित केले जाणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार 1 जून रोजी गृहमंत्री चित्रपट पाहणार आहेत.

स्क्रीनिंगशी संबंधित अधिक तपशील समोर आलेला नाही
गृहमंत्री हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दोन दिवस आधी पाहतील, असे दिग्दर्शकाने सांगितले आहे. सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या गौरवशाली जीवन प्रवासावर आधारित हा चित्रपट देशाचे माननीय गृहमंत्री पाहतील, हा आमचा सन्मान आहे, असे दिग्दर्शक म्हणाले आहेत. मात्र स्क्रीनिंगशी संबंधित अधिकचा तपशील त्यांनी दिलेला नाही. इतकेच नाही तर स्क्रिनिंग दिल्लीत होणार की गृहमंत्री मुंबईत येणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन
महान शासक पृथ्वीराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार सम्राट पृथ्वीराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पृथ्वीराज या चित्रपटातून माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात अक्षय आणि मानुषीसह संजय दत्त, सोनू सूद, आशुतोष राणा, साक्षी तन्वर आणि मानव विज हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे. 'पृथ्वीराज 3 जून रोजी हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज होणार आहे.

चित्रपटाशी निगडीत वाद
रिलीजपूर्वीच पृथ्वीराज हा चित्रपट वादात सापडल्याचे दिसत आहे. अखिल भारतीय वीर गुर्जर महासभेच्या म्हणण्यानुसार, पृथ्वीराज हे गुर्जर होते आणि त्यांना चित्रपटात गुर्जर म्हणूनच चित्रित करायला हवे होते. तसे झाले नाही तर आम्ही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशा इशारा त्यांनी दिला आहे. याआधी राजपूतांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या करणी सेनेने शीर्षकावरुन संताप व्यक्त करत शीर्षक बदलण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर आमची मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही हा चित्रपट राजस्थानमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही, असेही त्यांनी म्हटले.

बातम्या आणखी आहेत...