आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलीवूडमध्ये कोरोना:अमिताभ, अभिषेक यांची प्रकृती ठणठणीत, ऐश्वर्या- आराध्याही पॉझिटिव्ह, जया बच्चन निगेटिव्ह

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यानंतर ऐश्वर्या राय-बच्चन आणि त्यांची कन्या आराध्या यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आधी त्यांची अँटिजन चाचणी निगेटिव्ह आली होती, पण नंतर त्यांची स्वॅब चाचणी मात्र पॉझिटिव्ह आली. ४६ वर्षीय ऐश्वर्या व ८ वर्षांची आराध्या यांच्यात कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत. त्यामुळे घरीच त्यांच्यावर उपचार करणे शक्य आहे.

जया बच्चन यांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. मुंबई महापालिकेने अमिताभ यांच्या जलसा हा बंगल्यात पूर्णपणे निर्जंतुकीकरण केले व बंगल्याला सील करून परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला. ऐश्वर्या व आराध्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून दिली.

असा झाला कोरोनाचा संसर्ग

- अभिषेक बच्चन ८ जुलैला डबिंगसाठी वर्सोवा येथील स्टुडिआेत गेले होते. तेथेच लागण झाली असेल व त्यांच्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांनाही बाधा होण्याची शक्यता.

- जलसा हा बंगला कोरोना हॉटस्पॉट असेलल्या अंधेरी भागात आहे. बच्चन कुटुंबातील एखादा सदस्य किंवा कर्मचाऱ्यांपैकी कोणाला बाधा झाली अन् त्यांच्यापासून इतरांना लागण होण्याचीही शक्यता आहे.

अमिताभ, अभिषेक यांची प्रकृती ठणठणीत

अभिषेक बच्चन यांना काही दिवसांपासून हलका ताप होता. यानंतर कोरोनाची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. अमिताभ यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. तपासल्यानंतर त्यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला. सध्या दोघांची प्रकृती उत्तम आहे. बच्चन कुटुंबीयांच्या संपर्कात आलेल्या २६ लोकांची ओळख पटली आहे.

कोरोनाची बाधा झालेले बॉलीवूडचे चेहरे : अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय- बच्चन, राजू खेर (अनुपम खेर यांचे भाऊ), वाजिद खान, किरण कुमार, जोया माेरानी, करीम मोरानी, कनिका कपूर.

अनुपम खेर यांच्या कुटुंबात आई, भावासह चौघे पॉझिटिव्ह

बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांच्या आईला कोरोनाची लागण झाली. याबाबत अनुपम यांनी एका व्हिडिओद्वारे सांगितले. त्यांच्या आईला कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अनुपम यांचे भाऊ, वहिनी आणि पुतणीलाही लागण झाल्याचे स्पष्ट झाले, तर अनुपम यांचा अहवाल निगेटिव्ह आला.

बातम्या आणखी आहेत...