आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Amitabh And Abhishek Bachchan Corona Update Both Will Have To Stay In The Hospital For At Least Seven Days, Both Are Responding Well To Treatment

अमिताभ-अभिषेक बच्चन यांचे कोरोना अपडेट:पिता-पुत्राला किमान सात दिवस रुग्णालयात राहावे लागणार, दोघेही उपचारांना देत आहेत चांगला प्रतिसाद 

मुंबई3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी (11 जुलै) रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर दोघांवरही मुंबईतील नानावटी रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरु आहेत. दोघांनाही किती दिवस रुग्णालयात राहावे लागणार यासंदर्भातील माहिती आता समोर आली आहे. 

“दोघांची प्रकृती स्थिर असून उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांना किमान आणखी सात दिवस तरी रुग्णालयात राहावे लागणार आहे”, अशी माहिती रुग्णालयाने ‘पीटीआय’शी बोलताना दिली आहे. 

 • 12 जुलै रोजी अभिषेकने केले होते यासंदर्भात ट्विट 

अमिताभ आणि अभिषेक यांना नेमके किती दिवस रुग्णालयामध्ये ठेवणार? याविषयीचे एक ट्विट अभिषेकने 12 जुलै रोजी केले होते. “मी आणि माझे वडील किती दिवस रुग्णालयात राहणार ते सर्व डॉक्टरांवर अवलंबून आहे. प्रत्येकाने सावधगिरी बाळगून काळजी घ्यावी, कृपाकरुन नियमांचे पालन करा” असे अभिषेकने त्याच्या टि्वटमध्ये म्हटले होते.

- सोमवारचे प्रमुख अपडेट 

 • सोमवारी पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार- अमिताभ आणि अभिषेक हे दोघेही आयसोलेशन वॉर्डमध्ये असून त्यांची प्रकृती उपचारांवर उत्तम प्रतिसाद देत आहे. सध्या त्यांना कोणत्याही विशेष उपचाराची आवश्यकता नाही. त्यांच्यासाठी फर्स्ट लाइन मेडिकेशन योग्य आहे. त्यांना सपोर्टिव थेरेपी दिली जात आहे. दोघेही वेळेवर जेवण घेत आहेत.
 • नानावटी रुग्णालयाचे क्रिटिकल केअर सर्व्हिसचे प्रमुख डॉ. अब्दुल समद अन्सारी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे- अमिताभ यांना कोविडची लक्षणे दिसत असल्याचा हा कदाचित पाचवा दिवस आहे. रुग्णांमध्ये, कोरोनाचा प्रभाव 10 व्या किंवा 12 व्या दिवशी जास्त दिसून येतो. पण प्रत्येकाबरोबर असे होत नाही. बर्‍याच लोकांना सौम्य लक्षणे दिसतात.
 • दुस-या अहवालात रुग्णालयाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, अमिताभ यांची फुफ्फुसे कमकुवत असून त्यांची जुनी मेडिकल हिस्ट्री  विचारात घेता त्यांच्यावर नियंत्रित पद्धतीने उपचार सुरु आहेत. त्यांच्या फुफ्फुसांवर उपचारांचा कोणताही विपरीत परिणाम होऊ नये याची विशेष काळजी घेतली जात आहे.
 • अमिताभ आणि त्यांच्यासह कुटुंबातील तीघेेजण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्यांच्या घरातील 26 कर्मचा-यांची टेस्ट करण्यात आली होती. या सगळ्यांचे रिपोर्ट आले असून ते निगेटिव्ह असल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे. तर अमिताभ यांच्या पत्नी जया बच्चन, मुलगी श्वेता बच्चन नंदा, नात नव्या नवेली आणि नातू अगस्तय नंदा यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 

बिग बींचे चारही बंगले सील

बीएमसीने अमिताभ यांचे मुंबईतील चारही बंगले सॅनिटाइज करुन ते सील केले आहेत. त्यांच्या चारही बंगल्यांबाहेर नोटीस लावत कंटेन्मेंट झोन असे जाहिर करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या संपूर्ण कर्मचा-यांना 14 दिवसांसाठी होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.  

ऐश्वर्या आणि आराध्या होम क्वारंटाइन 

अमिताभ आणि अभिषेकसह ऐश्वर्या आणि आराध्या यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मात्र दोघींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही. त्या होम क्वारंटाइनमध्ये आहेत. मुंबई महापालिकेला सध्याच्या स्थितीबद्दल माहिती दिली असून ते आवश्यक ती सर्व पावले उचलत आहेत, असे अभिषेकने त्याच्या एका टि्वटमध्ये सांगितले होते.