आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक जुनी आठवण:जेव्हा अमिताभ बच्चन यांनी केली होती मायकल जॅक्सनची कॉपी, फोटो शेअर करुन म्हणाले -'ती माझी किती मोठी चूक होती'

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘मायकल जॅक्सनची कॉपी करणे ही माझी मोठी चूक होती’, असे ते म्हणाले आहेत.

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच सोशल मीडियावर ‘गंगा जमुना सरस्वती’ या चित्रपटाच्या सेटवरील एक जुना फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे बिग बींनी या फोटोसह दिलेले कॅप्शन सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘मायकल जॅक्सनची कॉपी करणे ही माझी मोठी चूक होती’, असे ते म्हणाले आहेत.

बिग बींनी लिहिले, 'जेव्हा मनमोहन देसाई यांना वाटले, गंगा जमुना सरस्वती या चित्रपटात मी मायकल जॅक्सनची कॉपी करु शकतो. ती माझी किती मोठी चूक होती', असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

कमेंट बॉक्समध्ये चाहते म्हणाले...
बिग बींच्या या पोस्टवर रणवीर सिंहने क्राउन इमोजी कमेंट केले. तर चाहत्यांनी हार्ट इमोजीसह चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले, "हे एक अतिशय सुंदर छायाचित्र आहे." तर एकाने लिहिले, "यू आर द बेस्ट सर."

बिग बींचे आगामी प्रोजेक्ट्स
यावर्षी बिग बींचा ‘गुलाबो सीताबो’ हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता. यानंतर ते लवकरच दिग्दर्शक नाग अश्विन यांच्या आगामी चित्रपटात प्रभास आणि दीपिका पदुकोणसह दिसणार आहेत. जवळपास 100 कोटी बजेट असलेल्या या अ‍ॅक्शन चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मेगा बजेट चित्रपटावर काम सुरू करण्यापूर्वी अमिताभ 'कौन बनेगा करोडपती 12'चे चित्रीकरण पूर्ण करतील.

बातम्या आणखी आहेत...