आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 79 व्या वर्षीही कमाईत बादशहा:'सात हिंदुस्तानी' या पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते 5000 रुपये, आज 15 ते 20 कोटी आहे मानधन

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'शोले'साठी मिळाले होते 1 लाख, 'खुदा गवाह'नंतर मानधन झाले 3 कोटी रुपये

अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 79 वर्षे पूर्ण केली आहेत. या वयातील बहुतेक लोक त्यांच्या बचतीवर आयुष्य जगत असतात, परंतु अमिताभ हे चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंट्स आणि टीव्ही शोच्या माध्यमातून आजच्या सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक आहेत आणि कमाईचे नवे रेकॉर्ड देखील बनवत आहेत. अमिताभ यांनी कोलकात्यात 500 रुपयांपासून कमाई सुरू केली आणि 1999 मध्ये दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहचले, पण पुन्हा उभारी घेत ते आज 3000 कोटींच्या संपत्तीसह जगातील आठव्या सर्वात श्रीमंत व्यक्तीत गणले जातात.

'शोले'साठी मिळाले होते 1 लाख, 'खुदा गवाह'नंतर मानधन झाले 3 कोटी रुपये
अमिताभ यांना 1969 मध्ये आलेल्या 'सात हिंदुस्तानी' या त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी 5000 रुपये मानधन मिळाले होते. यानंतर त्यांचेसलग आठ चित्रपट फ्लॉप झाले. चार वर्षानंतर, 1973 मध्ये आलेल्या 'जंजीर' चित्रपटामुळे त्यांचे नशीब चमकले. यानंतर एकामागून एक सुपरहिट चित्रपट आले आणि ते त्या काळातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेता ठरले. अमिताभ यांना 'शोले' या क्लासिक चित्रपटातील जयच्या भूमिकेसाठी एक लाख रुपये मिळाले होते. पाच वर्षांनंतर जेव्हा 'शान' हा चित्रपट आला, तोपर्यंत त्यांची फी 9 लाख रुपयांपर्यंत वाढली होती.

1996 मध्ये खुदा गवाह हा चित्रपट आला. यानंतर त्यांची फी 3 कोटींवर गेली. आज अमिताभ भूमिका किती लांब आहे आणि शेड्यूल किती दिवस असेल यावर 15 ते 20 कोटी रुपये आकारतात.

मिस वर्ल्ड स्पर्धेमुळे आले आर्थिक संकटात
1995 मध्ये अमिताभ बचच्न यांनी अमिताभ बच्चन कॉर्पाेरेशन लिमिटेड कंपनी सुरू केली होती. हॉलिवूड स्टुडिओजच्या धर्तीवर कॉर्पाेरेट पद्धतीने करण्याच्या उद्देशाने ती स्थापन केली होती. कंपनीने 15 चित्रपटही प्रदर्शित केले होते. प्रत्येक चित्रपटाचा खर्च 3 ते 8 कोटी होता. एबीसीएलने पहिल्यांदा मोठा धमाका 1996 मध्ये केला. एबीसीएलने पहिल्यांदाच मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे भारतात आयोजन
केले होते. बंगळुरुमध्ये ही स्पर्धा झाली होती. या स्पर्धेच्या आयोजनात त्यांना सात कोटींचा तोटा झाला होता. कोणतेही नियोजन वा व्यवस्थापनाशिवाय चाललेली कंपनी दुसऱ्या वर्षी तोट्यात आली. चार वर्षांत दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आली. कंपनीवर 90 कोटी रुपयांचे कर्ज होते. या कंपनीने मृत्युदाता हा चित्रपट बनवला होता, जो फ्लॉप झाला होता. यानंतरच्या एका मुलाखतीत अमिताभ म्हणाले होते, एबीसीएल सोडून द्यावे, असा अनेकांनी सल्ला दिला होता. मात्र, तिच्याशी मी जाेडला गेला होतो म्हणून लोकांनी पैसा गुंतवला होता. त्यामुळे तिला सोडून देऊ शकत नव्हतो.

यश चोप्रा आले मदतीला
एबीसीएल ही कंपनी तोट्यात गेल्यानंतर बिग बींनी एके दिवशी सकाळी यश चोप्रा यांचे घर गाठले. त्यांनी यश चोप्रांकडे काम मागितले. वयाच्या 58 व्या वर्षी बिग बींनी ‘मोहब्बते’ चित्रपटातून पुनरागमन केले. यानंतर त्यांनी व्यावसायिक कार्यक्रम, टीव्ही शो सुरू केले. 2000 मध्ये स्टार प्लसने ‘कौन बनेगा करोडपती’ शोसाठी करार केला. यामुळे कर्जफेड करण्यास मदत मिळाली. आणि त्यांची आर्थक परिस्थिती सुधारली.

केबीसीच्या एका सीझनमध्ये 70 कोटींची कमाई
कौन बनेगा करोडपती हा शो होस्ट करण्यासाठी अमिताभ यांना प्रत्येक एपिसोडसाठी 3.5 कोटी रुपये मिळतात, असे म्हटले जाते. जर एका पर्वाचे 20 भाग झाले तर त्यांना 70 कोटी मिळतात.

8 लाख रुपयांत खरेदी केला होता प्रतिक्षा बंदला, आता 31 कोटींमध्ये डुप्लेक्स घेतले

अमिताभ यांचे मुंबईत चार बंगले आहेत. त्यांनी 1975 मध्ये पहिला बंगला घेतला होता. प्रतिक्षा हे त्याचे बंगल्याचे नाव असून तो त्यांनी 8,06,248 रुपयांना खरेदी केला होता. ते अनेक वर्षे या बंगल्यात राहिले. सर्व फंक्शन या बंगल्यात होतात. अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न देखील या बंगल्यात झाले होते. आज प्रतीक्षा हा मुंबईचा आयकॉनिक पत्ता आहे.

  • प्रतिक्षा या बंगल्याच्या शेजारी 'जलसा' बंगला आहे. जिथे संपूर्ण बच्चन कुटुंब आज राहते. जवळच 'जनक' बंगला आहे जिथे त्यांचे कार्यालय आहे. आणि एक बंगला 'वत्स' आहे जो एका बँकेला भाडेतत्त्वावर देण्यात आला आहे.
  • अमिताभ यांनी 'जनक' 8 कोटींना तर 'वत्स' 5 कोटींना खरेदी केला होता. काही काळापूर्वीच त्यांनी अंधेरीतील एटलांटिस इमारतीच्या 27 व्या आणि 28 व्या मजल्यावर डुप्लेक्स खरेदी केले. 5184 चौरस फूट क्षेत्राच्या डुप्लेक्सची किंमत 31 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
  • याशिवाय अमिताभ यांच्याकडे अलाहाबादमध्ये कौटुंबिक मालमत्ता आहे. फ्रान्समध्येही त्यांची मालमत्ता आहे.
  • एकेकाळी ते कोलकात्यात सेकंड हँड फियाट कारने फिरत असत. आज त्यांच्याकडे रोल्स रॉयस, लँड रोव्हर, पोर्श, बेंटले आणि मर्सिडीजसह 11 कार आहेत.

2018 मध्ये 78 कोटी वार्षिक उत्पन्न, स्टॉकमध्ये 97 कोटी गुंतवणूक

जया बच्चन यांनी 2018 मध्ये राज्यसभा उमेदवार म्हणून त्यांच्या आणि अमिताभ यांच्या संपत्तीचा तपशील दिला होता. यानुसार 2016-17 मध्ये अमिताभ यांचे वार्षिक उत्पन्न 78 कोटी रुपये होते.

  • अमिताभ यांच्याकडे बँकेत 50 कोटी रुपये जमा होते. स्टॉकमध्ये 97 कोटी गुंतवले गेले. त्यांच्याकडे 28 कोटी किंमतीचे दागिने, दोन कोटींचे सोने आणि 5 कोटी रुपयांचे चांदीचे दागिने होते.
  • महाराष्ट्राव्यतिरिक्त अमिताभ यांच्याकडे गुजरात, हरियाणा आणि यूपीमध्ये जमीन होती. जया यांनी सांगितल्यानुसार, अमिताभ वाहन कर्ज घेत आले आहेत. 2018 पर्यंत, त्यांच्यावर बँक ऑफ इंडियामध्ये 1.84 कोटी, 64.03 लाख, 30.21 लाख आणि 12.46 लाखांचे वेगवेगळे वाहन कर्ज होते.
बातम्या आणखी आहेत...