आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बींवर झाले होते 90 कोटींचे कर्ज:कर्जदार घरी येऊन पैशांसाठी धमक्या द्यायचे; बंगलाही गमावण्याची वेळ आली होती

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुपरस्टार अमिताभ बच्चन 90 च्या दशकात दिवाळखोर झाले होते. त्यावेळी त्यांची अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड (ABCL) निर्मिती कंपनी मोठ्या तोट्यात गेली होती. त्यांच्यावर 90 कोटींचे कर्ज झाले होते. यासोबतच त्यांच्यावर 55 गुन्हेही दाखल झाले होते. लोक त्यांच्या घरी पैशांची मागणी करण्यासाठी यायचे.

बिग बींवर अगदी त्यांचा बंगला गमावण्याची वेळ आली होती. एका जुन्या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, तो त्यांच्या आयुष्यातील वाईट काळ होता. ते म्हणाले की कंपनी मोठ्या तोट्यात होती आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्यावेळी त्यांच्या सर्व मालमत्ता एकत्रच अटॅच होत्या.

कर्जदार दारात येऊन शिवीगाळ करायचे - बिग बी

वीर संघवींना दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत अमिताभ बच्चन म्हणाले होते, 'जे लोक माझ्या कंपनीत सहभागी होण्यासाठी उत्सुक होते ते अचानक बदलले. त्यांची वृत्ती विरोधी बनली होती. ते खूप उद्धट झाले आणि अनादर करायला लागले. एकंदरीत, गोष्टी बिघडल्या होत्या. सावकार दारात येऊन शिवीगाळ करायचे आणि धमक्या देऊन पैसे परत मागायचे.

'त्यावेळी कोणीही चांगला सल्ला दिला नाही'

आपल्या कर्जाबद्दल बोलताना बिग बी पुढे म्हणाले, 'यापैकी काही कर्ज आम्ही प्रसार भारती आणि दूरदर्शन सारख्या सरकारी संस्थांकडून घेतले होते. काही कर्ज बँकांकडून आणि वैयक्तिक कर्ज घेतले होते.

याशिवाय जया आणि मी चुकून वैयक्तिक हमीही दिली होती. त्यावेळी आम्हाला कोणीही चांगला आर्थिक सल्ला दिला नव्हता. काहीही होणार नाही, असे आम्हाला सांगण्यात आले, त्यामुळे आम्ही काळजी न करता हमीपत्रांवर सह्या केल्या.

1995 मध्ये स्थापन झालेली कंपनी एका वर्षात तोट्यात गेली

अमिताभ बच्चन यांनी 1995 मध्ये अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड (ABCL) ही कंपनी सुरू केली. पहिल्या वर्षी, कंपनीने 65 कोटी रुपयांची उलाढाल केली आणि 15 कोटींचा नफा झाला. पण दुसऱ्या वर्षी ग्रोथ कमी झाली.

त्याची कंपनी इव्हेंट मॅनेजमेंटही करायची. एका इव्हेंटमध्ये कंपनीला 4 कोटी रुपयांचे नुकसान झाले. यानंतर कंपनीच्या बॅनरखाली बनवलेले मृत्युदतासारखे काही चित्रपट फ्लॉप झाले. यामुळे कंपनीचे आणखी नुकसान झाले.

कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नव्हते

1999 पर्यंत अशी परिस्थिती आली की अमिताभ बच्चन यांच्याकडे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही पैसे नव्हते. लोकांचा कंपनीवरील विश्वास उडू लागला होता. त्यानंतर त्यांच्या घरी कर्जदार यायला लागले. इथपर्यंत पोहोचले की त्यांना त्यांचा दुसरा बंगला 'प्रतीक्षा' गहाण ठेवावा लागला. बिग बी खूप निराश असायचे. त्यांना रात्री झोपही येत नव्हती.

मोहब्बतें आणि केबीसीमुळे नशीब पुन्हा चमकले

एवढ्या मोठ्या आपत्तीनंतर अखेर अमिताभ बच्चन यांचे दिवस पुन्हा बदलू लागले. त्यांना यश चोप्रांचा मोहब्बतें आणि टीव्ही रिअॅलिटी शो कौन बनेगा करोडपती होस्ट करायला मिळाला. 2013 मध्ये इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत बिग बी केबीसीबद्दल म्हणाले, "हे माझ्याकडे अशा वेळी आले जेव्हा मला याची सर्वात जास्त गरज होती.

रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, बिग बींनी पहिल्या सीझनच्या 85 एपिसोड्समधून सुमारे 15 कोटी रुपये कमावले. यानंतर, मोहब्बतें या सुपरहिट चित्रपटात काम केल्यानंतर त्यांच्याकडे पुन्हा चित्रपट आणि जाहिरातींची रीघ लागली. त्यातून कमावलेल्या पैशांतून बिग बींनी त्यांचे सर्व कर्ज फेडले.

बिग बींनी कर्जाचा प्रत्येक पैसा परत केला

अभिनेते परेश रावल एका मुलाखतीत म्हणाले होते की, 'अमिताभ बच्चन यांच्यावर इतके कर्ज होते, तरीही त्यांनी कधीही कोणाबद्दल वाईट बोलले नाही. त्यांना वाटले असते तर कायद्याचा आधार घेता आला असता, पण त्याने प्रत्येक रुपया त्यांनी परत केला, शेवटी ते हरिवंशराय बच्चन यांचे पुत्र आहेत. कबूल करावे लागेल, काय माणूस आहे."

याशिवाय परेश रावल म्हणाले की, अमिताभ बच्चन त्यांच्या चांगल्या दिवसांतही आब राखून असायचे, नाहीतर आजकालचे नवे कलाकार थोडी प्रसिद्धी मिळाल्यावर नखरे करतात.