आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्येष्ठ अभिनेते 'बिग बी' अमिताभ बच्चन हैदराबाद येथे शूटिंग करताना जखमी झाले आहेत. अभिनेता प्रभाससोबतच्या 'प्रोजेक्ट के' या चित्रपटासाठी ते चित्रीकरण करत असताना त्यांना अपघात झाला. या घटनेनंतर हैदराबादहून त्यांना तत्काळ मुंबईत हलवण्यात आले आहे. उपचारांनंतर आता बिग बी घरी विश्रांती घेत आहेत. चित्रपटातील एक अॅक्शन सीन करताना त्यांच्या बरगड्यांना इजा झाली. या अपघातानंतर खूप वेदना होत असून श्वास घ्यायला त्रास होत असल्याची माहिती स्वतः बिग बींनी त्यांच्या ब्लॉगवरुन दिली आहे. त्यांच्या अपघाताची माहिती समोर येताच चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. आजपासून जवळजवळ 40 वर्षांपूर्वी असाच एक अॅक्शन सीन करताना बिग बी मृत्यूच्या दाढेत गेले होते. पण प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर ते बरे झाले. पण त्या दुर्घटनेमुळे बिग बींना आजही एक त्रास होतो. ज्याचा खुलासा त्यांनीच काही दिवसांपूर्वी 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात केला होता. त्यावेळी नेमके काय घडले होते ते वाचा...
'कुली' चित्रपटाच्या सेटवर झाला होता भयंकर अपघात
जवळजवळ 40 वर्षांपूर्वी वर्षांपुर्वी अमिताभ बच्चन यांना एक भयंकर अपघात झाला होता. जुलैच्या शेवटचा आठवडा सुरु होता. अमिताभ बच्चन 26 जुलै 1982 रोजी बंगळुरुमध्ये 'कुली' चित्रपटाची शूटिंग करत होते. एका फाइट सीनची शूटिंग सुरु होती. अॅक्शन डायरेक्टरने सांगितल्यानुसार पुनीत इस्सर यांना अमिताभ यांच्या तोंडावर बुक्का मारायचा होता आणि त्यांना टेबलवर पडायचे होते. हा सीन अमिताभ यांच्या बॉडी डबलसोबत करण्याचे सजेशन देण्यात आले होते. परंतू बिग बी यांना सीनला रिअल टच द्यायचा होता. यामुळे त्यांनी स्वतः हा सीन करण्याचा निर्णय घेतला. कलाकार तयार झाले. लाइट्स ऑन झाले. कॅमरा अँगल सेट करण्यात आला. डायरेक्टरने अॅक्शन म्हणताच शूटिंग सुरु झाली. शॉट ओके झाला आणि लोक टाळ्या वाजवू लागले. अमिताभ यांच्या चेह-यावरही स्माइल होती. परंतू तेव्हा त्यांना पोटात वेदना सुरु झाल्या. पुनीत इस्सर यांनी त्यांच्या पोटात जोरदार मुक्का मारला होता. 'कुली' शूटिंग दरम्यान झालेली ही इजा सुरुवातीला खुप सामान्य होती. परंतू दोन दिवसांनंतर ही घातक ठरली याचा त्रास त्यांना आजही होतो.
डॉक्टरांना सुरुवातीला सापडली नाही जखम
बिग बी यांना वेदना होत होत्या. त्यांना इजा कुठे झाली आहे हे त्यांना माहिती होते. परंतू त्यामधून एक थेंबही रक्त बाहेर पडले नव्हते. यामुळे बिग बी आणि कास्ट-क्रू मेंबर्सला ही जखम किरकोळ वाटली. त्यांच्या पोटावर दोन वेळा मलम लावण्यात आला. परंतू त्यांना आराम मिळाला नाही. म्हणून ते हॉटेलवर आराम करण्यासाठी गेले. तिथे डॉक्टरांना बोलावण्यात आले. डॉक्टर म्हणाले की, जखम खोल नाही. डॉक्टर औषध देऊन निघून गेले.
एक्स-रेमध्ये कळली नाही जखम
अपघाताच्या दुस-या दिवशीही वेदना कमी झाल्या नाही. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या पर्सनल फिजिशियन के. एम. शाह यांना बोलावले. डॉ. शाह यांनी त्यांची अवस्था पाहून त्यांना बंगळुरुच्या सेंट फिलोमेना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांचा एक्स-रे काढण्यात आला. तरीही त्यांना कोणत्याही प्रकारची गंभीर जखम दिसली नाही. तेव्हा बिग बींच्या अजून टेस्ट कराव्या असा सल्ला एक्सपर्टने दिला.
हे होते वेदनेचे कारण
तिस-या दिवशीही त्यांच्या परिस्थितीत सुधारणा झाली नाही. पुन्हा एकदा एक्स-रे काढण्यात आला. कोणताही गंभीर आजार निघाला नाही. डॉक्टरांनी एक्स-रे बारीक चेक केला. तेव्हा त्यांना डायफ्रामच्या खाली गॅस दिसत होते. ते फाटलेल्या आतड्यांमधून बाहेर पडत होते.
नंतर शरीरात इन्फेक्शन पसरले
चौथ्या दिवशी अमिताभ यांची परिस्थिती बिघडली. वेल्लोरच्या प्रसिध्द सर्जन एच.एस. भट्ट यांनी अमिताभ बच्चन यांची केस पाहिली. रिपोर्ट पाहता डॉ. भट्ट म्हणाले की, 'तात्काळ ऑपरेशन करावे लागेल. कारण इन्फेक्शन बिग बींच्या बॉडीमध्ये पसरले आहे.' अमिताभ यांना खुप ताप होता. ते वारंवार उलटी करत होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारात त्यांची तब्येत खुप बिघडली. त्यांच्या हृदयाचे ठोके एका मिनितात 72 असायला हवे तर 180 च्या स्पीडने सुरु झाले. यानंतर ते कोमामध्ये गेले.
सर्जरीनंतर डॉक्टर हैरान होते
डॉक्टरांनी ऑपरेशन सुरु केले. त्यांनी बिग बींचे पोट चिरुन पाहिले तर ते हैरान होते. अमिताभ यांच्या पोटातील महत्त्वाची आतडी (पोटातील अंगांना जोडून ठेवणारी आणि केमिकल्सपासून बचाव करणारी) फाटली होती. लहान आतडीही डॅमेज झाली होती. या स्थितीत कोणीही 3-4 तासांपेक्षा जास्त जिवंत राहणे अवघड असते. परंतू अमिताभ 3 दिवस या परिस्थितीत होते. डॉक्टरांनी त्यांची आतडी शिवली.
ऑपरेशननंतर निमोनिया
ऑपरेशननंतर अमिताभ यांना निमोनिया झाला. त्यांच्या शरीरात विष परसरत होते. रक्त पातळ होत होते. ब्लड डेंसिटी सुधारण्यासाठी बंगळुरुमध्ये सेल्स उपलब्ध नव्हत्या. मग त्या मुंबईतून मागवण्यात आल्या. रक्तात सेल्स मिसळल्यानंतर अमिताभ यांची प्रकृती 4 दिवसांनंतर सुधारली. परंतू 29 जुलैला त्यांची परिस्थिती पुन्हा बिघडली. नंतर डॉक्टरांनी निर्णय घेऊन त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
2 ऑगस्ट रोजी पुन्हा झाले ऑपरेशन
2 ऑगस्टला अमिताभ बच्चन यांचे पुन्हा एकदा ऑपरेशन करण्यात आले. हे ऑपरेशन जवळपास 8 तास चालले. त्यावेळी ब्रीच कँडी हॉस्पिटलबाहेर चाहत्यांनी गर्दी केली. देशभरात चाहता वर्ग अमिताभ यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत होते. कोणी अमिताभ यांच्या नावाने पूजा-अर्चा करत होते तर कोणी होम हवन करवून घेत होते. तेव्हा अखेर चाहत्यांच्या प्रार्थनेला यश आले आणि अमिताभ बच्चन बरे होऊन पुन्हा घरी परतले.
24 सप्टेंबरला मिळाला डिस्चार्ज
16 ऑगस्टला अमिताभ खायला-प्यायला लागले आणि काही पाऊल चालत होते. त्यांच्या प्रकृतीत किंचीत सुधारणा झाली. 24 सप्टेंबर रोजी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर चाहत्यांचे धन्यवाद देत अमिताभ म्हणाले होते की, 'जिंदगी और मौत के बीच यह एक भयावह अग्नि परीक्षा थी। दो महीने का अस्पताल प्रवास और मौत से लड़ाई खत्म हो चुकी है। अब मैं मौत पर विजय पाकर अपने घर प्रतीक्षा लौट रहा हूं।' त्यांना घरी पोहोचून हात हलवून आपल्या शुभचिंतकांचे आभार मानले होते.
काही दिवसांपूर्वी 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटवर दुर्घटनेबद्दल सांगितले होते
काही दिवसांपूर्वी अमिताभ यांनी त्यांच्या 'कुली' चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यासोबत झालेल्या दुर्घटनेबद्दल सांगितले होते. ते म्हणाले की, जेव्हा सेटवर त्यांना गंभीर दुखापत झाली, तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा चित्रपटाचे चित्रिकरण बंगळुरूमध्ये सुरू होते. त्यानंतर पुढील उपचारांसाठी अमिताभ यांना मुंबईला आणण्यात आले. अमिताभ यांनी सांगितले की, त्या अपघातानंतर त्यांच्यावर अनेक सर्जरी करण्यात आल्या. त्यानंतर त्यांना बरे व्हायला अनेक महिने लागले. अमिताभ बच्चन सध्या ठिक आहेत, मात्र तो अपघात झाल्यापासून ते त्यांच्या डाव्या हाथाच्या मनगटावर पल्सची तपासणी करू शकत नाही.
चित्रपट अभिनेते बीग बी अमिताभ बच्चन हैदराबाद येथे शूटिंगदरम्यान जखमी झालेत. त्यांनी स्वतःच आपल्या ब्लॉगवर याची माहिती दिली आहे. ते सध्या मुंबईतील आपल्या घरी आराम करत आहेत. अमिताभ बच्चन हे प्रभासच्या 'प्रोजेक्ट K' या चित्रपटाचे शूटिंग करत होते. त्यात एक अॅक्शन सीन करताना त्यांच्या बरगड्यांना इजा झाली. हैदराबादेतील उपचारानंतर त्यांना मुंबईला पाठवण्यात आले आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.