आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पान मसाल्याच्या जाहिरातीवरुन वादात सापडले आहेत. पान मसाल्याची जाहिरात केल्याने त्यांच्यावर अनेक चाहते नाराज झाले होते. आता याप्रकरणी राष्ट्रीय तंबाखूविरोधी संघटने (एनजीओ)ने बिग बींना एख पत्र पाठवत लवकरात लवकर या जाहिरातीच्या कॅम्पेनमधुन बाहेर पडण्याची विनंती केली आहे.
अलीकडेच आलेल्या एबीपीच्या वृत्तानुसार नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर एरडिकेशन ऑफ टोबॅको या संघटनेचे अध्यक्ष शेखर साळकर यांनी बिग बींना यासंदर्भात पत्र पाठवले आहे. ते म्हणाले की, ‘संशोधनात पान मसाला आणि तंबाखूच्या व्यसमानुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात हे सिद्ध झाले आहे. विशेषतः तरुणांसाठी हे अधिक हानीकारक आहे. मिस्टर बच्चन हे सरकारच्या पल्स पोलिओ जाहिरातीच्या मोहिमेचे ब्रॅण्ड एम्बेसेडर आहेत तर त्यांनी पान मसाल्याच्या जाहिरातीतून लवकरात लवकर बाहेर पडणे गरजेच आहे.’
शेखर साळकर यांनी या पत्रात इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) यांच्या पुराव्यांचा दाखला देत पान सुपारीमधील कार्सिनोजेन्समुळे तोंडाचा कर्करोग होऊ शकतो असा दावा केला आहे. ते म्हणाले, 'ऑन्कोलॉजिस्ट आणि तंबाखू बंदीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेचा सदस्य या नात्याने मला दु:ख होत आहे की, बॉलिवूडमधील शाहरुख खान, अजय देवगण, रणवीर सिंह अशा अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींनी अशा जाहिराती केल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूचे सेवन वाढू लागले आहे.'
पान मसाल्याच्या जाहिरातीवरुन ट्रोल झाल्यानंतर बिग बींनी दिले होते उत्तर
अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच एक पोस्ट शेअर केली होती, त्यात लिहिले होते, 'घड्याळ खरेदी करुन हातावर काय बांधले, वेळ मागे पडला.' या ट्वीटमध्ये एका यूजरने कमेंट करताना लिहिले, 'नमस्कार सर तुम्हाला एक विचारायचे आहे, तुम्हाला कमला पसंद पान मसाला ही जाहिरात करायची अशी काय वेळ आली. मग तुमच्यात आणि इतर कलाकारांमध्ये काय फरक?'
या युजरच्या कमेंटला अमिताभ यांनी उत्तर दिले होते. त्यांनी लिहिले होते, 'मला माफ करा कोणत्या व्यवसायाला कमी जास्त मानू नये, आपल्यामुळे जर एखाद्याचे भले होत असेल तर ते करायला हरकत आहे. जर एखादा व्यवसाय असेल तर आपल्याला आपल्या व्यवसायाबद्दल देखील विचार करावा लागतो. आता तुम्हाला असे वाटते की मी ही जाहिरात करायला नको होती पण मला यासाठी मानधान मिळते. आमच्या व्यवसायात काम करणारे अनेक लोक आहेत, ज्यांना रोजगार आणि मानधन मिळते आणि माझे काही चुकले असेल तर पुन्हा मला माफ करा.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.