आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडमध्ये नवीन वर्षाचा जल्लोष:अमिताभ बच्चनसह बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी केले नवीन वर्षाचे स्वागत, सोनम कपूरचा दिसला रोमँटिक अंदाज

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या सेलिब्रिटींनी त्यांच्या सेलिब्रेशनची छायाचित्रे सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहेत.

बॉलिवूड सेलिब्रिटींनी 2021 या नवीन वर्षाचे स्वागत वेगवेगळ्या अंदाजात केले. कोविड 19 मुळे सेलिब्रिटींनी घरीच राहून सेलिब्रेशन करणे पसंत केले. या सेलिब्रिटींनी त्यांच्या सेलिब्रेशनची छायाचित्रे सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहेत. फोटो शेअर करताना प्रत्येकाने त्यांच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ते कूल लूकमध्ये दिसत आहेत. त्यामध्ये त्यांनी स्टाइलिश चष्मा आणि डोक्यावर टोपी घातलेली दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अमिताभ यांनी चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

ऐश्वर्या बच्चन हिने देखील कुटुंबासोबत 2021 चे स्वागत केले. तिने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये अमिताभ आपल्या कूल लूकमध्ये असून जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि आराध्या बच्चन फोटोमध्ये दिसत आहेत.

अभिनेत्री सोनम कपूरने पती आनंद आहुजासोबत घरीच न्यू इयरचे सेलिब्रेशन केले. तिने सोशल मीडियावर आनंदसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. '"2021, मी तुला प्रेमाने मिठी मारण्यास तयार आहे. हे वर्ष प्रेम, कुटुंब, मित्र, काम, प्रवास, आध्यात्मिक विकास आणि ब-याच गोष्टींनी परिपूर्ण असेल. मी फक्त माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम वेळेची वाट पाहत आहे. आम्ही कठोर परिश्रम करू आणि आयुष्य जगू. आम्ही कधीही मागे हटनार नाही," अशी पोस्ट सोनमने शेअर केली आहे.

सारा अली खानने आपला भाऊ इब्राहिमसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, 'भावासोबत नवीन वर्ष साजरे करणे नेहमीच मजेदार आहे. तो माझी सर्व भीती दूर करतो आणि माझे अश्रू पुसतो.'

ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर पती अक्षय कुमारसोबतचा फोटो शेअर केला असून चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रियांका चोप्राने पती निक जोनाससोबत नवीन वर्ष साजरे करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे दोघेही सध्या लंडनमध्ये आहेत. 'नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आशा करते की नवीन वर्षात सर्वकाही चांगले होईल,' असे कॅप्शन तिने फोटोसह दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...