आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑनलाइन प्रीमियर:आता अ‍ॅमेझॉन प्राइमवर झळकणार अमिताभ-आयुष्मान यांचा 'गुलाबो-सिताबो', 12 जून रोजी 200 देशांत होणार रिलीज

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमिताभ यांनी 'गुलाबो-सीताबो' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचे स्वागत केले आहे.
  • चित्रपटाची रिलीज डेट 17 एप्रिल होती, परंतु लॉकडाऊनमुळे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकला नाही.

मुंबई. अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना स्टारर कॉमेडी फिल्म 'गुलाबो सीताबो' आता सिनेमा हॉलऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येतोय. गुरुवारी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने जाहीर केले की, 12 जून रोजी हा चित्रपट जगातील 200 देशांमध्ये प्रदर्शित होईल.

अ‍ॅमेझॉनने आपल्या ताज्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "या 12 जून रोजी 'गुलाबो सीताबो'च्या जागतिक प्रीमिअरच्या फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी आम्हाला जॉईन व्हा." या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 17 एप्रिल ठरली होती. परंतु लॉकडाऊनमुळे चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. विशेष म्हणजे पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर बॉलिवूडचा एखादा चित्रपट थेट प्रदर्शित होत आहे.

अमिताभ यांनी स्वागत केले

ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'गुलाबो सीताबो' प्रदर्शित होत असल्याचे अमिताभ बच्चन यांनी स्वागत केले आहे. रिलीजच्या तारखेची घोषणा करत त्यांनी ट्विटरवर लिहिले की, "एका प्रतिष्ठित माणसाची आणि त्याच्या अनोख्या भाडेकरूची कहाणी... 'गुलाबो सीताबो'चा 12 जून रोजी प्राइम व्हिडिओवर प्रीमियर होईल." या चित्रपटात अमिताभ लखनौच्या नवाबी जमीनदारांची भूमिका साकारत आहेत आणि आयुष्मान त्यांचा भाडेकरू झाला आहे.

आयुष्मान नाखुश

स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, चित्रपटाचे दिग्दर्शक शुजित सरकार आणि निर्माता रॉनी स्क्रूवाला यांनी थिएटरऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला तेव्हा आयुष्मान खुरानाचे त्यांच्याशी एकमत झाले नाही. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्याच्या बाजूने तो होता.

बातम्या आणखी आहेत...