आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साँग आऊट:'गुलाबो सिताबो'चं पहिलं गाणं 'जूतम फेंक' रिलीज, घरमालक आणि भाडेकरु यांच्यातील मजेशीर खटके वेधून घेतात लक्ष 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिग बींनी सोशल मीडियावर या व्हिडीओची लिंक शेअर केली आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘गुलाबो सिताबो’मधील पहिले गाणे बुधवारी रिलीज झाले आहे. ‘जूतम फेंक’ असे या गाण्याचे बोल असून यात बिग बी आणि आयुषमान यांच्यातील भांडणाचे मजेशीर खटके दाखविण्यात आले आहेत. बिग बींनी सोशल मीडियावर या व्हिडीओची लिंक शेअर केली आहे. 

पियूष मिश्रांनी चढवला स्वरसाज 

शुजीत सरकार दिग्दर्शित या चित्रपटातलं ‘जूतम फेंक’ हे गाणं पियूष मिश्रा यांनी गायलं आहे. तर पुनीत शर्मा यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. या चित्रपटात बिग बी ‘मिर्झा’ ही भूमिका साकारत असून ते घरमालक आहेत. तर ‘बांके’ म्हणजे आयुषमान खुराना त्यांचा भाडेकरु दाखविला आहे.

काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरमधून बिग बी आणि आयुषमान खुराना यांची जोडी मजेशीर अंदाजात पाहायला मिळाली. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत. ‘गुलाबो सिताबो’च्या भन्नाट ट्रेलरनंतर हे नवीन गाणं प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. 

बातम्या आणखी आहेत...