आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बच्चन कुटुंबात कोरोना:बुधवारी पुन्हा केली जाणार अमिताभ आणि त्यांच्या कुटुंबीयांची कोविड टेस्ट, या आठवड्यात मिळू शकतो त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिषेक, ऐश्वर्या, आराध्या यांची प्रकृती वेगाने सुधारत आहे, अमिताभ हळू हळू रिकव्हर होत आहेत.
  • या आठवड्यात संपूर्ण बच्चन कुटुंबीयांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार घेत असलेले अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या प्रकृतीविषयी नवीन अपडेट समोर आले आहे. वृत्तानुसार, चारही सदस्य (अमिताभ, त्यांचा मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या आणि नात आराध्या) आता ठीक आहेत आणि बुधवारी त्यांची पुन्हा कोरोना चाचणी होणार आहे. जेणेकरून ते कोविड मुक्त झाले आहेत की नाही हे तपासले जाईल.

  • 77 वर्षीय अमिताभ हळू हळू बरे होत आहेत

टाईम्स ऑफ इंडियाने रुग्णालयाशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, 44 वर्षीय अभिषेक, 46 वर्षीय ऐश्वर्या आणि 8 वर्षीय आराध्याची प्रकृती वेगाने सुधारत आहे. त्याचवेळी, 77 वर्षीय अमिताभ हळू हळू बरे होत आहे.

रिपोर्टमध्ये असे लिहिले आहे की, "हे सर्व (बच्चन कुटुंबातील चारही सदस्य) बरे आहेत. त्यांच्यावर उपचारांचा चांगला परिणाम दिसून येत आहे. हे चौघेही आयसोलेशन वॉर्डमध्ये आहेत. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन अजून एक ते दोन दिवस हॉस्पिटलमध्ये थांबतील. ऐश्वर्याला कफ होता, तो आता बरा झाला आहे. ऐश्वर्या आणि आराध्याला अजून काही दिवस  हॉस्पिटलमध्ये थांबावे लागू शकते."

  • बिग बींच्या तब्येतीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत डॉक्टर

बिग बींची मेडिकल हिस्ट्री बघता डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेऊन असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर अभिषेकने हा निर्णय घेतला आहे की, जोवर त्याचे वडील पूर्णपणे बरे होत नाही, तोपर्यंत तो स्वतःही रुग्णालयातून डिस्चार्ज घेणार नाही. या आठवड्यात संपूर्ण बच्चन कुटुंबीयांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकेल अशी आशा आहे.

  • अमिताभ चाहत्यांचे आभार मानतच आहेत

याकाळातही बिग बी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहेत. सोमवारी रात्री त्यांनी चाहत्यांसाठी एक ब्लॉग लिहिला. ज्यामध्ये ते म्हणाले की तुम्ही सर्वजण माझ्यासाठी सतत प्रार्थना आणि काळजी करत आहात आणि मी फक्त हात जोडतोय. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातूनही चाहत्यांचे आभार मानले आहेत. 'या कठीण प्रसंगात तुम्ही माझ्यावर करत असलेले प्रेम आणि माझ्यासाठी करत असलेली काळजी या सगळ्यातच माझा दिवस जात आहे. या सोशल मीडियाच्या माध्यमातून शक्य होईल तसे सगळ्यांच्याच शुभेच्छा स्वीकारण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद', असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

  • बिग बी 11 दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहेत

कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर 11 जुलैला अमिताभ आणि अभिषेक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 6 दिवसांनंतर, 17 जुलै रोजी, ऐश्वर्या आणि आराध्या यांनाही प्रकृती बिघडल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले. सर्वांवर डॉक्टर बर्वे आणि डॉ. अन्सारी यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. हे दोन्ही डॉक्टर बर्‍याच दिवसांपासून बच्चन कुटुंबाचे वैद्यकीय सल्लागार आहेत.