आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉन 3:चित्रपटात एकत्र दिसणार अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान, एक्सेल एंटरटेनमेंट करत आहे सिक्वेलचं प्लानिंग

4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक्सेल एंटरटेनमेंट बनवणार 'डॉन 3'

बॉलिवूडचा लोकप्रिय चित्रपट 'डॉन'चा तिसरा भाग बनणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान एकत्र दिसणार असल्याचे बोलले जात आहे. फरहान अख्तरची कंपनी एक्सेल एंटरटेन्मेंट या चित्रपटाच्या सिक्वेलची योजना आखत आहे. त्याचबरोबर फरहाननेही स्क्रिप्टवर काम देखील सुरू केले आहे.

एक्सेल एंटरटेनमेंट बनवणार 'डॉन 3'
चित्रपटाच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, “डॉन हा एक्सेलमधील प्रत्येकाच्या जवळचा विषय आहे. टीम गेल्या काही दिवसांपासून 'डॉन 3' बद्दल विचार करत आहे, पण चांगली स्क्रिप्ट नसल्यामुळे त्यावर काम सुरु झाले नव्हते. पण आता टीमला एक रोमांचक विषय सापडला आहे आणि तो फ्रँचायझीला पुढच्या स्तरावर नेईल."

'डॉन 3'च्या निर्मात्यांच्या यादीत रणवीर सिंग
सूत्राने पुढे सांगितले की, 'फरहानने चित्रपटाची स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केली आहे. गेल्या काही प्रयत्नांमुळे यावेळची कल्पना वेगळी आणि कमालीची आहे. पटकथा लॉक झाल्यानंतर तो शाहरुखला कथा सांगेल. यावेळी रणवीर सिंग देखील चित्रपट निर्मात्यांच्या यादीत आहे, परंतु त्याच्यासोबत अमिताभ आणि शाहरुख यात दिसावे अशी त्याची इच्छा आहे."

'डॉन'ची स्क्रिप्ट विकत घ्यायला कुणीही तयार नव्हते
चंद्रा बरोट दिग्दर्शित 'डॉन' हा अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट 1978 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात बिग बींशिवाय झीनत अमान, प्राण आणि इफ्तेखार यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटाची कथा एका मोस्ट वाँटेड डॉनभोवती फिरते, ज्याची भूमिका अमिताभ बच्चन यांनी साकारली आहे. यामध्ये ते दुहेरी भूमिकेत होते. चंद्रा बरोट आणि नरिमन इराणी यांच्या आधी सलीम-जावेद यांच्याकडून डॉनची स्क्रिप्ट घ्यायला कोणी तयार नव्हते.

बातम्या आणखी आहेत...