आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपकमिंग फिल्म:13 हजार फूट उंचीवर जाऊन शूटिंग करणार अमिताभ, अनुपम, डॅनी अन् बोमन इराणी, ट्रॅकवर निघालेल्या 4 मित्रांची कथा

अमित कर्ण9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 4 ऑक्टोबरपासून सुरू झाले शूटिंग
  • सूरज बडजात्या करणार दिग्दर्शन
  • 30 दिवसांचे नेपाळचे शेड्यूल
  • 500 लोकांची टीम असेल

राजश्री प्रॉडक्शनचा आगामी चित्रपट ‘ऊंचाई’ मैत्रीवर आधारित आहे. त्याचे शूटिंग सध्या नेपाळमध्ये सुरू आहे. यात 4 मित्रांची कथा आहे, ते हिमालयावर ट्रेकिंग करायला जातात. यात अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी आणि डॅनी डेंग्जोपा मुख्य भूमिका साकारणार आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटाचे शूटिंग 13 हजार फूटाच्या उंचीवर केले जाणार आहे. चित्रपटात परिणीती चोप्रा, सारिका आणि नीना गुप्तादेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. याचे दिग्दर्शन सूरज बडजात्या करणार आहेत.

सर्वात धोकादायक विमानतळ लुक्लावर होणार शूट
चित्रपटाचे शूटिंग अरेंज करणारे सूरज आचार्यने दिव्य मराठीला खास माहिती दिली. चित्रपटाचे शूटिंग 4 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. काठमांडूमध्ये पहिले शेड्यूल महिनाभर चालणार आहे. दोन दिवस काठमांडूमध्ये शूटिंग झाल्यानंतर सर्वच लुक्ला विमानतळावर शूटिंग करणार आहेत. लुक्लाचे जगातील सर्वात धोकादायक विमानतळ मानले जाते. येथुनच हिमालयावर जाण्याचा रस्ता सुरू होतो. तेथे 6 ते 9 ऑक्टोबरपर्यंत परिणीती, बोममन, अनुपम, सारिका आणि नीना गुप्ता शूटिंग करणार आहेत.

लुक्लानंतर पूर्ण टीम नामचे लोकेशनवर शूटिंग करणार आहे. ती जागा 13 हजार फुटाच्या उंचीवर आहे. तेथे 18 ऑक्टोबरपर्यंत शूटिंग होणार आहे. तेथुन मनंग भागाकडे वळणार आहेत. ती जागा समुद्रसपाटीपासून 11 हजार फुटाच्या उंचीवर आहे.

नेपाळी टूरिस्ट गाइडच्या भूमिकेत परिणीती
चित्रपटात परिणीती एका नेपाळी पर्यटक गाइडची भूमिका साकारणार आहे. यावर्षी रिलीज झालेल्या ‘संदीप और पिंकी फरार’चे शूटिंगदेखीन तिने नेपाळमध्ये केले होते. सध्या ‘ऊंचाई’साठी 150 लोकांची टीम खासगी विमानाने मुंबईवरुन काठमांडुला गेली आहे. नेपाळचे तंत्रज्ञ, गाइड, टुरिस्ट गाइड आणि कलाकार मिळून एकूण ३५० लोकांना हायर करण्यात आले आहे. अशा प्रकारे चित्रपटावर 500 लोकांची टीम काम करत आहे. महिन्याभराच्या या शूटिंगवर राजश्री प्रॉडक्शनचे8 कोटी रुपये खर्च होत आहेत.

यापूर्वीदेखील अवघड परिस्थितीत झाले आहे शूटिंग

  • 'काबुल एक्सप्रेस’चे शूटिंग कंधारमध्ये झाले होते. तेथे स्थानिक अतिरेकी संघटनेकडून कबीर खानला सतत धमक्या मिळत होत्या.
  • ‘एलओसी: कारगिल’च्या शूटिंगदरम्यान कडाक्याच्या थंडीत दोन क्रू मेंबर्सचा जीव गेला होता.
  • ‘जब वी मेट’मधील गाणे ‘ये इश्क हाय’चे शूटिंग हिमाचलच्या रोहतांगजवळ झाले होते. तेथे भूस्खलनाचा प्रकार जास्त होतो.
  • 'पान सिंह तोमर’चे शूटिंग चंबलच्या खोऱ्यात झाले होते. दरोडेखोरांनी निर्मात्यांचे नुकसान केले नाही मात्र निर्मात्यांनी कमी साहित्यात शूटिंग केले.
बातम्या आणखी आहेत...