आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांतला इंडस्ट्रीकडून पत्र:बिग बींनी सुशांतची आठवण काढत लिहिले... 'का..का...का?', अनुपम खेर म्हणाले - 'ही आत्महत्या माझा आत्मा पिळवटून टाकणारी'

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्क्रिनशॉर्ट शेअर करत अर्जुन कपूरने वाहिली सुशांतला श्रदांजली, म्हणाला - “तेव्हा सुशांतला आईची आठवण येत होती”
  • करण जोहर म्हणाला - नाती टिकवून ठेवण्याची आवश्यकता समजली

सुशांत सिंह राजपूत आता आमच्यात राहिले नाहीत. त्यांच्या स्मरणात संपूर्ण चित्रपट उद्योग दु:खी आहे. बच्चन साहेबांपासून ते त्यांच्या शेवटच्या चित्रपटाची अभिनेत्री संजना सांघीपर्यंत सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, सुशांतने हे का केले? त्याच वेळी काही कलाकारांनी त्यांना दिलेल्या वाईट वागणुकीबद्दल माफी मागितली.

  • बिग बींनी सुशांतची आठवण काढत लिहिले... "का..का...का?

सुशांत, तुम्ही स्वतःला संपवले? तुम्ही एक उत्तम अभिनेता होतात. काहीही न बोलता, काहीही न मागता, कायमसाठी झोपून गेलात. बिग बींनी सुशांतचे कौतुक करत लिहिले की... त्यांनी अनेकदा स्वतःला जीवनाच्या तत्त्वज्ञानाच्या कसोटीवर उतरून सादर केले. लोक त्यांच्या विचारांच्या या सखोलतेवर अचंबित होत असत. मी ‘धोनी’मध्ये त्याचे काम पाहिले. त्यात त्यांनी संस्मरणीय अभिनय केला. त्यांच्याशी जेव्हा जेव्हा संवाद साधला, तेव्हा जाणवले की त्यांच्या आत अजून बरेच काही आहे, जे व्यक्त झालेले नाही. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत धोनीचा शॉट कॉपी करण्यासाठी धोनीचा व्हिडीओ 100 वेळा पाहिला. हे त्यांच्या व्यावसायिक प्रयत्नांचे गांभीर्य होते. ते नृत्य दिग्दर्शक श्यामक डावर यांच्या कार्यक्रमांमध्ये नर्तकांच्या चौथ्या ओळीत असायचे. तिथून आज जिथे ते होते तिथे पोहोचणे खरं तर खूप मोठी गोष्ट आहे.

  • मानसिक तणावाच्या दुर्बल क्षणात पाऊल उचलले नाही - अर्जुन कपूर

अर्जुन कपूरने सुशांतबरोबरच्या शेवटच्या संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहिले... "18 महिन्यांपूर्वी... "केदारनाथ' रिलीज झाल्यानंतर जेव्हा त्याने आईबद्दल पोस्ट केली तेव्हा मला त्याचा शेवटचा संदेश मिळाला होता. मला फक्त आशा आहे की जेव्हा हा गोंधळ संपेल तेव्हा आपल्याला कळेल की त्याने मानसिक तणावाच्या दुर्बल क्षणामुळे किंवा एखाद्या व्यावसायिक कारणाने हे पाऊल उचलले नाही. 

  • नाती टिकवून ठेवण्याची आवश्यकता समजली - करण जोहर

करण जोहरने लिहिले ... "मी स्वत:ला जबाबदार धरतो की वर्षभरापासून मी तुझ्या संपर्कात नव्हतो. बऱ्याच वेळा मला असे वाटले की, तुलाही आपले दु:ख व्यक्त करायला एखाद्याची गरज आहे, पण मी असा विचार कधीही केला नाही. आम्ही गर्दीत असूनही एकटे राहतो. काही लोक या एकटेपणाचा सामना करू शकत नाहीत. सुशांतच्या निधनामुळे मला समजले की सर्व नाती टिकवून ठेवणे आवश्यक आहे.

  • ही आत्महत्या माझा आत्मा पिळवटून टाकणारी - अनुपम खेर

अभिनेता अनुपम खेर यांनी सुद्धा व्हिडीओ पोस्टमध्ये सुशांतचे स्मरण करत सांगितले... "मी धोनी बायोपिकमध्ये सुशांतच्या वडिलांची भूमिका केली होती. कथा पिता-पुत्राची असल्याने आमचे नातेही पिता-पुत्रासारखे झाले. मला माहीत आहे की केवळ बोलण्याने दु:ख कमी होणार नाही. काही भावना, काही दु:ख, काही अपघातांचे शब्दांत वर्णन करणे अवघड असते. या बातमीने माझ्या आत्म्याला पिळून टाकले आहे.'

0