आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महानायक संतापले:मृत्यूची कामना करणाऱ्यांसाठी बिग बी झाले अँग्री मॅन; माझी नऊ कोटी फॉलोअर्सची सेना, त्यांना सांगेन...ठोक दो सा$# को!

मुंबई3 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • तुम्ही तुमच्याच आगीत जळा...रुग्णालयात दाखल अमिताभ यांनी घेतला ट्रोलर्सचा समाचार

महानायक अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह असल्याने ते मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल आहेत. सोमवारी रात्री त्यांनी ब्लॉग लिहीत, ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतला. सुरुवातीला त्यांनी सून ऐश्वर्या व नात आराध्याच्या बरे होण्याबद्दल आनंद व्यक्त केला. मात्र नंतर ‘मी विषाणूमुळे मरावे’ असे मेसेज येत असल्याचा खुलासा केला. ट्रोलर्सवर रागावलेल्या बच्चन यांनी पहिल्यांदाच सोशल मीडियावर कठोर शब्द वापरले. त्यांनी लिहिलेल्या ब्लॉगचा संपादित भाग....

रुग्णालयात माझ्या मनात निवृत्तीचे विचार येत होते, मात्र आता माझे मन दुसरीकडेच कुठे तरी भटकते...

नात आराध्या आणि ए‌े‌श्वर्या घरी परतले आहेत. अश्रूंचा बांध फुटला आहे. माझी गोंडस नात बिलगत म्हणाली, दु:खी होऊ नका, तुम्हीही लवकरच घरी याल. तिच्या आश्वासनावर मला विश्वास ठेवायलाच हवा. रुग्णालयातील बेडवर मनात आता निवृत्त होण्याचा विचार येत आहे. हे विचार मला रात्रभर अस्वस्थ करतात... पण आता लक्ष आता इतरत्र जाते. “ते’ माझ्यासाठी लिहितात, म्हणे की, “मी आशा करतो , तुम्ही कोविडमुळे संपावे.

हे मिस्टर अज्ञात... तू वडिलांचे नावदेखील लिहीत नाहीस, कारण तुझे वडील कोण आहेत हेच तुला ठाऊक नाही. दोनच गोष्टी घडू शकतात.… एक तर मी मरेन किंवा जगेन. मी मेलो तर तुम्ही कोणत्याही सेलिब्रिटीवर कठोर टीका करू शकणार नाही. दुर्दैवाने, तुमच्या लिखाणाकडे कोणीही लक्ष देणार नाही. कारण तुम्ही अमिताभ बच्चन यांच्यावर स्वाइप केले होते...जे फार काळ टिकणार नाही. जर मी देवाच्या कृपेने जगलोच, तर तुम्हाला स्वाइपचा सामना करावा लागेल. केवळ माझाच नाही तर माझ्या ९०+ मिलियन फॉलोअर्सचाही. त्यांना मी अजून सांगितलेले नाही...मात्र आता मी जिवंत असल्यामुळे सांगेन की, ते एक सैन्य आहे. जे जगभर पसरलेले आहे. पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत आणि उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत…

आणि आता मी त्या सर्वांना सांगेन - ठोक दो सा$# को

मारीच, अहिरावण, महिषासुर, असुर, उपनाम हो तुम;

हमारा यज्ञ प्रारम्भ होते ही, तुम राक्षसों की तरह तड़पोगे;

जान लो इतना कि अब तुम ही केवल समाज की आवाज ना हो;

चरित्रहीन, अविश्वासी, श्रद्धाहीन, लीचड़ तुम हो;

जलो गलो पिघलो, बेशर्म, बेहया, निर्लज्ज, समाज कलंकी।

तुम अपनी ही बेचैनी में जल जाओ...।

या कवितेने बच्चन यांनी ब्लॉगचा शेवट केला.