आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Amitabh Bachchan Became Maternal Grandfather, Niece Naina Gave Birth To A Son; Husband Kunal Kapoor Gave Good News To The Fans By Sharing The Post

गुड न्यूज:अमिताभ बच्चन झाले आजोबा, पुतणी नैनाने दिला मुलाला जन्म; पती कुणाल कपूरने पोस्ट शेअर करून चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमिताभ बच्चन यांची पुतणी आहे नैना

बॉलिवूडचा लोकप्रिय चित्रपट 'रंग दे बसंती' फेम अभिनेता कुणाल कपूर बाबा झाला आहे. कुणालची पत्नी नैना बच्चन हिने मुलाला जन्म दिला आहे. स्वतः कुणालने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. यासोबतच त्याने देवाचे आभारही मानले आहेत.

आम्ही एका सुंदर मुलाचे आई-बाबा झाले आहोत
कुणाल कपूरने पोस्ट शेअर करत लिहिले, "नैना आणि मला तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की आम्ही एका मुलाचे आई-बाबा झाले आहोत. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. या अनमोल भेटीसाठी आम्ही देवाचे आभार मानतो," या आशयाची पोस्ट कुणालने शेअर केली आहे.

हृतिक रोशनसह अनेक सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा
कुणाल कपूरच्या या पोस्टवर कमेंट करताना हृतिक रोशनने लिहिले की, "हृतिक चाचूकडून खूप खूप प्रेम." हृतिक व्यतिरिक्त, श्वेता बच्चन, सुझान खान, अंगद बेदी, सायरस साहुकार, तारा शर्मा, अक्षय ओबेरॉय यांच्यासह अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी देखील कमेंट करून या जोडप्याचे अभिनंदन केले आहे.

अमिताभ बच्चन यांची पुतणी आहे नैना
कुणाल कपूर आणि त्याची पत्नी नैना यांनी प्रेग्नेंसीची बातमी सिक्रेट ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान दोघांनीही सोशल मीडियावर एकही फोटो आणि व्हिडिओ शेअर केला नाही. दोघांनी 2015 मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या 8 वर्षांनंतर हे दोघे आईवडील झाले आहेत. नैना ही ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची पुतणी आहे. या अर्थाने अमिताभही आजोबा झाले आहेत. अजिताभ बच्चन आणि रमोला हे नैनाचे पालक आहेत.

'अनकही कहानियां'मध्ये दिसला होता कुणाल
वर्क फ्रंटवर सांगायचे तर कुणाल कपूर लवकरच एका शॉर्ट फिल्मद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. तो विंटर ऑलिंपियन शिव केशवन यांच्या बायोपिकचीही निर्मिती करत आहे. कुणाल शेवटचा नेटफ्लिक्सच्या 'अनकही कहानियां'मध्ये दिसला होता, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता.

ऑगस्ट 2021 मध्ये OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झालेल्या 'द एम्पायर' या वेब सीरिजमध्ये कुणाल मुघल सम्राट बाबरच्या भूमिकेत दिसला होता. या सीरिजमध्ये कुणालशिवाय डिनो मोरिया, दृष्टी धामी, शबाना आझमी, राहुल देव, सहार बंबा आणि आदित्य सील हे देखील मुख्य भूमिकेत दिसले होते.

बातम्या आणखी आहेत...