आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोलकातामध्ये अमिताभ बच्चन यांचे मंदिर आहे. रविवारी म्हणजे 11 अक्टोबरला बिग बी 78 वर्षांचे झाले. प्रत्येकवर्षीप्रमाणे मंदिरात अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे, मात्र वेगवेगळ्या पध्दतींनी केला जातो. प्रत्येक वेळी यज्ञ, पूजा आणि केक कापले जात होते. गर्दीही मोठ्या प्रमाणात होत होती. मात्र, यावेळी कोरोना काळामुळे सेलिब्रेशन थोडे वेगळे आहे. अमिताभ यांच्या चाहत्याने एक हजार मास्क आणि एक हजार सॅनिटायझर वाटणे आणि 200 लोकांना राशन देण्याची तयारी केली.
अमिताभ यांचे नाव गुरू
कोलकातामध्ये अमिताभ यांना त्यांचे चाहते गुरू म्हणून बोलावतात. येथे 2001 मध्ये मंदिर बनवण्यासोबतच बिग बींचा वाढदिवस मोठी घटना असते. यावर्षी पूजा-अर्चा झाली, मात्र ही पूजा अनेक निर्बंधांमध्ये झाली. मंदिरातील मुख्य सदस्यांनाच यामध्ये सामिल होण्याची संधी मिळाली. बाहेरच्या लोकांनाचा येथे येण्याची संधी मिळाली नव्हती. पूजेदरम्यान कोरोना काळातील बंधन आणि सोशल डिस्टेंसिंगविषयी संपूर्ण काळजी घेण्यात आली.
कोरोनाला हरवणाऱ्या अमिताभ यांची व्हर्चुअल मीट
मंदिराचे संस्थापक संजय पटोदिया यांनी सांगितले की, आजच्या दिवशी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक व्हर्चुअल मीटिंग ठेवली आहे. अमिताभ बच्चन यांनाही या मीटिंगमध्ये सामिल करण्याचे वचन दिले आहे. या व्यतिरिक्त फिल्म मेकर शूजित सरकार यांनाही या व्हर्चुअल मीटिंगमध्ये बोलावले आहे. या व्हर्चुअल मीटच्या माध्यमातून अमिताभ जगभरातील चाहत्यांशी जोडले जातील. पटोदिया म्हणाले की, यावर्षी गुरूचा बर्थडे खास आहे, कारण ते कोरोना व्हायरसशी लढले आणि त्याला हरवले.
अमिताभ चालिसाने होते बिग बींची पूजा
त्यांनी म्हटले की, प्रत्येकवर्षी प्रमाणे यावर्षीही मंदिर सजवले जाईल. केकही कापले जाईल, मात्र केवळ 10-15 लोकांच्या उपस्थितीत. आम्ही अमिताभ बच्चन यांना नैवेद्य दाखवू. त्यांच्या आई-वडिलांच्या पूजेनंतर बिग बींची पूजा होईल. यानंतर अमिताभ चालिसाचे पढन केले जाईल. असे प्रत्येकवर्षी होते. आम्ही यावर्षी अमिताभ बच्चन यांच्या नावाने मास्क, सॅनिटायझर आणि राशन वाटू. अमिताभ यांचे हे मंदिर साउथ कोलकाताच्या बोंदेल गेटच्या परिसरात आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.