आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बींचा 79 वा वाढदिवस:अजय देवगणने एक खास फोटो शेअर करत अमिताभ बच्चन यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, रणवीर सिंहने बिग बींना म्हटले 'गँगस्टर' ; मुलगी श्वेताने सुधारली वडिलांची चूक

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिषेक-ऐश्वर्या बिग बींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पॅरिसहून परतले

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आज त्यांचा 79 वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने त्यांचे चाहते, मित्र आणि कुटुंबातील सदस्य सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, अमिताभ यांचा आगामी चित्रपट 'मेडे'मधील त्यांचा सहकलाकार अजय देवगणनेही एक खास पोस्ट शेअर करून बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय अमितजी: अजय
अजय देवगणने अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा 'मेडे' या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर करताना लिहिले, "सर, तुमच्याकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहताना मला जाणवतं की, खरा कलाकार काय असतो. प्रिय अमित जी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा."

अमिताभ बच्चन आज आपला 79 वा वाढदिवस साजरा करत आहेत आणि 80 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. रात्री 11.30 वाजता सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले, "...मी 80 व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे.'

श्वेताने सुधारली वडिलांची चूक
अमिताभ यांनी ही पोस्ट शेअर केल्यानंतर लगेचच त्यांची मुलगी श्वेता नंदा हिने कॉमेन्ट केली आहे. या कॉमेन्टमध्ये श्वेताने केवळ 79 आणि एक इमोजी शेअर केला आहे. अमिताभ यांनी चुकीने त्यांचा 80 वा वाढदिवस असल्याचे सांगितले होते. दुसरीकडे, अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे चाहते आणि कलाकार शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने 'स्वॅग.. वाढदिवसाच्या शुभेच्छा सर.' तर रणवीर सिंह याने लिहिले की, ‘गँगस्टर’.

अभिषेक-ऐश्वर्या बिग बींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पॅरिसहून परतले अमिताभ यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय हेही पॅरिसहून मुंबईला परतले आहेत. सोमवारी सकाळी ते विमानतळावर दिसला. त्यांचे विमानतळावरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत अभिषेक आणि ऐश्वर्या सोबत त्यांची मुलगी आराध्या देखील दिसत आहे.

चाहत्यांनी जलसाबाहेर केक कापला
दुसरीकडे, बिग बींच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांनी 'जलसा' या निवासस्थानाबाहेर केक कापला. या सेलिब्रेशनचे देखील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरही समोर आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...