आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदतीचा हात:अमिताभ बच्चन यांनी वाराणसीच्या 500 स्थलांतरित मजुरांसाठी तीन विमान केले बुक, पहिल्या विमानातून 180 मजूूर रवाना 

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठविण्याच्या संपूर्ण कामावर एबी कॉर्पोरेशन लिमिटेड देखरेख ठेवत आहे.
  • बंगाल, बिहार, तामिळनाडू आणि इतर राज्यांतील स्थलांतरित मजुरांसाठी विमान तिकिटांचीही व्यवस्था केली जाणार आहे.

अभिनेता सोनू सूद नंतर आता अमिताभ बच्चन यांनी स्थलांतरित मजुरांसाठी विमानांची व्यवस्था केली आहे. वाराणसीतील 500 कामगारांना त्यांच्या घरी नेण्यासाठी त्यांनी तीन फ्लाइट बुक केल्या आहेत. बुधवारी सकाळी पहिल्या विमानाने 180 मजुरांसह उड्डाण घेतल्याचे सांगण्यात येत आहे. उर्वरित दोन फ्लाइडही बुधवारी रवाना होतील. त्यांच्याबद्दल अद्याप फारशी माहिती समोर आली नाही.

वृत्तानुसार, हे सर्व काम अमिताभ बच्चन यांची कंपनी एबी कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक राजेश यादव यांच्या देखरेखीखाली केले जात आहे. मिड-डेने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले की, 'हे सर्व काम अत्यंत गोपनिय पद्धतीने केले जात आहे, कारण अमिताभ यांना प्रसिद्धी नको होती. परप्रांतीय मजुरांची दुर्दशा पाहून ते स्वत:ला रोखू शकले नाहीत आणि मदतीसाठी पुढे येण्याचे त्यांनी ठरविले."

  • प्रथम ट्रेनने पाठवण्याची योजना होती

सूत्रांनी सांगितले की, "अमिताभ यांनी वाराणसीला जाण्यासाठी इंडिगोचे विमान भाड्याने घेतले. 180 स्थलांतरित मजुरांना सकाळी 6 वाजता विमानतळावर पोहोचण्यास सांगण्यात आले होते. पूर्वी या मजुरांना ट्रेनने पाठवण्याची योजना होती, परंतु काही कारणास्तव तसे झाले नाही."  येत्या काही दिवसांत अमिताभ पश्चिम बंगाल, बिहार, तामिळनाडू आणि इतर राज्यातील स्थलांतरित मजुरांसाठी विमान तिकिटांचीही व्यवस्था करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • यापूर्वी 10 बसेसची केली होती व्यवस्था

उत्तर प्रदेशमधील स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी बसेसची व्यवस्था केली होती. 29 मे रोजी हाजी अली दर्गा येथून 10 बस रवाना झाल्या होत्या. बसमध्ये सुरक्षा आणि सोयीशीसंबंधित सर्व गोष्टींची काळजी घेण्यात आली होती. यामध्ये मजुरांच्या खाण्यापिण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. सर्वांना मास्क आणि सॅनिटायजर्स देण्यात आले. मेडिकल किटची सुविधाही बसमध्ये उपलब्ध होती. उत्तर प्रदेशातील लखनऊ, अलाहाबाद, गोरखपूर आणि भदोई या जिल्ह्यांतील 250 मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यात आले होते. 

  • अमिताभ यांचे मदतकार्य दोन महिन्यांपासून सुरू आहे

बातम्यांनुसार, अमिताभ बच्चन गेल्या दोन महिन्यांपासून मदतकार्यात व्यस्त आहेत. त्यांची कंपनी एबी कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक राजेश यादव त्यांच्या वतीने गरजूंना मदत करत आहेत. राजेश यादव हे हाजी अली ट्रस्ट आणि पीर मखदूम साहब ट्रस्ट यांच्या सहकार्याने हाजी अली दर्गा, अँटॉप हिल, बाबुलनाथ मंदिर, माहीम दर्गा, धारावी, सायन 90 फीट रोड, अरब गली, कोसला बंदर आणि वरळी लोटससह मुंबईतील विविध ठिकाणी दररोज 4500 हून अधिक फूड पॅकेट्स वितरित करत आहेत.

  • हजारो कुटुंबांना रेशन दिले

बिग बींच्या कार्यालयाने एक हजार कुटूंबांसाठी 1000 रेशन पॅकेटसुद्धा उपलब्ध करुन दिले आहेत. हे रेशन प्रत्येक गरजु कुटुंबाला एक महिना पुरेल इतके आहे. त्याशिवाय 9 मेपासून ते आणि त्यांची टीम मुंबईहून घरी पतरणा-या परप्रांतीय मजुरांना दररोज 2000 रेशन पाकिट, 2000 पाण्याच्या बाटल्या आणि सुमारे 1200 जोड्या स्लीपर प्रदान करत आहेत.

  • असंख्य मास्क आणि सॅनिटायझर्सचे वाटप देखील केले

अमिताभ यांच्या कार्यालयाने वेगवेगळ्या एजन्सी आणि स्थानिक अधिका-यांच्या सहकार्याने असंख्य मास्क, सॅनिटायझर्स वितरित केले आहेत. त्यांनी रुग्णालये, पोलिस ठाणे, बीएमसी कार्यालये आणि अंत्यसंस्काराच्या ठिकाणी 20,000 हून अधिक पीपीई किट दान केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...