आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट आला निगेटिव्ह:9 दिवसांच्या आयसोलेशननंतर कामावर परतले बिग बी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना अलीकडेच दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली होती, मात्र आता त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आज सकाळी त्यांनी सोशल मीडियावर आपल्या ब्लॉगद्वारे ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.

बिग बींचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला
अमिताभ बच्चन यांनी गुरुवारी सकाळी त्यांच्या ब्लॉगवर लिहिले, 'कामावर परत.. तुमच्या प्रार्थनांसाठी आभारी आहे. काल रात्री माझा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. 9 दिवसांचे आयसोलेशन आता संपले आहे. तसे, फक्त 7 दिवस अनिवार्य आहेत. नेहमीप्रमाणे माझे तुम्हा सर्वांवर प्रेम. या कोविड काळात तुम्ही खूप दयाळू आणि काळजीत होतात. घरच्यांनीही माझी खूप काळजी घेतली. मी तुम्हा सर्वांचे हात जोडून आभार मानतो,' असे बिग बी म्हणाले आहेत.

लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही बिग बींना झाली लागण

अमिताभ यांनी नुकतेच त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले होते की, 'कोरोनापासून बचाव करण्यासाठी मी सातत्याने आवश्यक पावले उचलत होतो आणि काळजी घेत होतो. कोविड लसीच्या दोन्ही डोस व्यतिरिक्त, मला बूस्टर शॉट देखील मिळाला होता, परंतु शेवटी, कोविडचा विजय झाला. कोरोना संसर्गाबद्दल तपशील देणे निरर्थक ठरेल. मी निराश आहे असे म्हणणे देखील चुकीचे ठरेल... मला फक्त माझ्या कुटुंबाची आणि जवळच्या लोकांची काळजी आहे,' असे त्यांनी लिहिले होते.

बिग बींना दुसऱ्यांदा झाली होती लागण
बिग बी यावेळी दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आले होते. यापूर्वी जुलै 2020 मध्ये ते कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. अमिताभ बच्चन यांनी एप्रिल 2021 मध्ये लसीचा पहिला डोस घेतला आणि मे 2021 मध्ये दुसरा डोस घेतला. यासोबतच त्यांनी बऱ्याच दिवसांपासून चाहत्यांना भेटणेही बंद केले आहे. सध्या ते टीव्हीवर 'कौन बनेगा करोडपती 14' होस्ट करत आहे.

बातम्या आणखी आहेत...