आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Amitabh Bachchan Could Not Hold Back His Tears, When Aishwarya Rai And Aaradhya Bachchan Went Home From Hospital, Aaradhya Told Him Not To Cry

अमिताभ यांचा रुग्णालयातील 18 वा दिवस:नात आणि सूनेला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्याने बिग बींना आनंदाश्रू अनावर, आराध्या म्हणाली - 'रडू नका, तुम्हीही लवकरच घरी परत याल'

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगवर आणि सोशल मीडिया अकाउंटवर या भावनिक क्षणांबद्दल लिहिले आहे.

अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या कोरोनामुक्त झाल्या असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता दोघीही घरी पोहोचल्या आहेत. हे बघून 77 वर्षीय बिग बी यांना आनंदाश्रू अनावर झाले होते. तेव्हा त्यांची 8 वर्षांची नात आराध्याने त्यांना धीर दिला आणि लवकरच बरे होऊन तुम्हीही घरी परत याल, असे सांगितले. या भावनिक क्षणांबद्दल अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये सांगितले आहे.

बिग बींनी लिहिले,“आमच्या चिमुकलीला आणि सुनबाईंना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. माझ्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीयेत. आराध्याने मला मिठी मारली आणि धीर दिला. तुम्ही रडू नका, लवकरच तुम्हीही घरी परताल, असा विश्वास तिने मला दिला. देवा तुझी कृपा आहे”, असे बिग बींनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर सांगितले.

  • 18 दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये आहेत बिग बी

अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक यांना रुग्णालयात दाखल होऊन 17 दिवस झाले आहेत. आज 18 वा दिवस आहे. 11 जुलै रोजी संध्याकाळी कोविड 19ची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. 6 दिवसांनंतर 17 जुलै रोजी ऐश्वर्या आणि आराध्या यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांनादेखील नानावटी हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमध्ये 10 दिवस राहिल्यानंतर, 11 व्या दिवशी म्हणजे 27 जुलै रोजी ऐश्वर्या आणि आराध्या यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली आणि त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. ही बातमी अभिषेकने ट्विट करुन दिली होती.