आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेदना:तीन दिवसानंतरही  इरफान-ऋषीच्या मृत्यूच्या दु:खातून स्वतःला सावरु शकले नाहीत अमिताभ, सोशल मीडियावर लिहिली इमोशनल पोस्ट 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिग बींनी आपल्या वेदना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

24 तासांच्या आत इरफान खान आणि ऋषी कपूर या बॉलिवूडच्या दोन दिग्गजांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. 29 एप्रिल रोजी वयाच्या 53 व्या वर्षी इरफानने या जगातून कायमची एक्झिट घेतली तर 30 एप्रिल रोजी ऋषी कपूरही जगातून कायमचे निघून गेले. दोघेही कर्करोगाशी झुंज देत होते. मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी दोन्ही अभिनेत्यांसोबत चित्रपटांमध्ये काम केले होते आणि दोघेही त्यांच्या हृदयाच्या अगदी जवळ होते. तीन दिवसांनंतरही या कलाकारांच्या दु: खातून ते स्वतःला सावरु शकलेले नाहीत. बिग बींनी आपल्या वेदना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. 

अमिताभ यांनी ऋषी कपूर यांच्यासोबतचा आपला फोटो शेअर करताना एका भावूक पोस्टमध्ये लिहिली आहे. 

पाच दशकांपासून ऋषी कपूरसोबत होती मैत्री 

ऋषी गेली पाच दशके अमिताभ यांचे मित्र होते. या दोघांनी 'कभी कभी' (1976), 'अमर अकबर अँथनी' (1977), 'नसीब' (1981), 'कुली' (1983), 'अजुबा' (1991) आणि '102 नॉट आउट' (2018) या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. तर 2015 मध्ये आलेल्यी  ‘पीकू’मध्ये इरफानसोबत त्यांनी काम केले होते.  

ऋषी यांना संगीतमय श्रद्धांजलीही वाहिलीली

शुक्रवारी रात्री उशिरा अमिताभ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ऋषी यांना संगीतमय श्रद्धांजलीही दिली होती. त्यांनी ऋषी यांच्यासोबतचा शेवटचा चित्रपट '102 नॉट आउट'मधील  'वक्त ने किया क्या हंसी सितम'  हे गाणे शेअर केले होते. हे भावनिक गाणे दोन्ही कलाकारांवर चित्रित करण्यात आले होते. उमेश शुक्ला दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभने  यांनी ऋषी कपूरच्या वडिलांचे पात्र साकारले होते.  

बातम्या आणखी आहेत...