आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमिताभ बच्चन नुकतेच दुखापतीतून बरे होऊन कामावर परतले आहेत. दरम्यान, त्यांनी नवीन फिटनेस ट्रेनरची नियुक्ती केली आहे. अमिताभ यांच्या नवीन फिटनेस ट्रेनरचे नाव शिवोहम आहे. त्याने अमिताभ यांच्यापूर्वी रणबीर कपूर, सुष्मिता सेन, जॅकलिन आणि आयुष्मान खुराना यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना फिटनेस ट्रेनिंग दिली आहे.
सोमवारी शिवोहमने एक पोस्ट शेअर करत फिटनेस ट्रेनर म्हणून नियुक्त केल्याबद्दल अमिताभ बच्चन यांचे आभार मानले आहे. प्रकृती ठिक झाल्यानंतर अमिताभ फिटनेस ट्रेनिंगसोबत योगा करत आहेत. यासाठी त्यांनी योगा थेरपिस्ट वृंदा यांची नियुक्ती केली आहे.
शिवोहम म्हणाला - मला तुमचा फिटनेस कोच बनवल्याबद्दल धन्यवाद
शिवोहमने अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसह त्याने पोस्टमध्ये लिहिले- 'जेव्हा वन अँड ओन्ली वन अमिताभ बच्चन त्यांच्या फिटनेस आणि आरोग्यासाठी तुमच्याकडून प्रशिक्षण घेण्यास सहमत होतात... फिटनेस प्रशिक्षक म्हणून माझ्या व्यवसायाप्रती अनेक वर्षे केलेल्या मेहनत आणि समर्पणाचे हे फळ आहे. ट्रेनिंग हा आपल्या जीवनशैलीचा एक भाग आहे. यामध्ये वयाचा कोणताही अडथळा नाही. यासाठी मिस्टर बच्चन यांच्यापेक्षा मोठा पुरावा नाही. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि मला तुमचा फिजिकल फिटनेस कोच बनण्याची परवानगी दिल्याबद्दल सर तुमचे खूप खूप आभार. माझी शिफारस केल्याबद्दल आणि नेहमी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल वृंदा तुझे आभार.
अमिताभ योग थेरपिस्टकडून ट्रेनिंग घेत आहेत
बिग बी केवळ फिजिकल ट्रेनिंगवरच लक्ष केंद्रित करत नाहीयेत तर ते योगा देखील करत आहेत. यासाठी त्यांनी योगा थेरपिस्ट वृंदा यांना हायर केले आहे.
अमिताभ आणि शिवोहमसोबतचा फोटो शेअर करत वृंदाने लिहिले- 'आरोग्य आणि फिटनेसची काळजी घ्यावी लागेल. योग आणि फिजिकल ट्रेनिंग या दोन्हींचे महत्त्व जाणून घेतल्याबद्दल आणि तुमच्या फिटनेसबद्दल आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.'
KBC 15 ची नोंदणी झाली सुरू
अमिताभ बच्चन यांचा प्रसिद्ध रिअॅलिटी शो KBC 15 ची नोंदणी 29 एप्रिलपासून सुरू झाली आहे. अर्थातच बिग बी लवकरच हॉट सीटवर बसून स्पर्धकांना प्रश्न विचारताना दिसणार आहेत. प्रोमो शेअर करून निर्मात्यांनी सीझन 15 साठी नोंदणी सुरू केल्याची घोषणा केली आहे. मात्र, हा शो कधी प्रसारित केला जाईल, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.