आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Amitabh Bachchan From The Isolation Ward Shared Lines In Honor Of The Doctors, Said Pristine White Their Layered Dress; Dedicated To Serve They Be; God Like Incarnations They

रुग्णालयातील चौथा दिवस:आयसोलेशन वार्डातून अमिताभ बच्चन यांनी डॉक्टरांच्या सन्मानार्थ शेअर केल्या ओळी, म्हणाले - 'ईश्वर रूपी देवता ये, पीड़ितों के संबल ये'

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बुधवारी रुग्णालयात अमिताभ आणि अभिषेकचा यांचा चौथा दिवस
  • अमिताभ यांनी डॉक्टरांची तुलना पांढऱ्या कपड्यांच्या देवतांशी केली

कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांचा बुधवारी नानावटी रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये चौथा दिवस आहे. वृत्तानुसार, दोघांवरही उपचारांचा चांगला परिणाम होत आहे. शनिवारी संसर्ग झाल्यावर त्यांना येथे दाखल करण्यात आले. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा महानायक यांनी सोशल मीडियावर काही ओळी शेअर केल्या, ज्याद्वारे त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांची देवतांशी तुलना केली.

अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले...'श्वेत वर्ण आभूषण, सेवा भाव समर्पण, ईश्वर रूपी देवता ये, पीड़ितों के संबल ये, स्वयं को मिटा दिया, गले हमें लगा लिया, पूजा दर्शन के स्थान ये, परचम इंसानियत के...'  यासोबतच त्यांनी आपल्या ब्लॉगवर आपले डेली रुटीन फॉलो करत आपल्या काही चाहत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

याच ओळी त्यांनी इंग्रजीतही शेअर केल्या 

आणखी काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागेल

मंगळवारी वृत्तसंस्था पीटीआयने रुग्णालयाशी संबंधित सूत्रांचा हवाला देऊन सांगितले होते की बच्चन पिता-पुत्र यांना किमान 7 दिवस रुग्णालयात रहावे लागेल. त्याचबरोबर काही अहवालांमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की दोघांची पुढील टेस्ट 5-6 दिवसांनंतर होईल.