आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अमिताभ यांचा रुग्णालयातील दहावा दिवस:ब्लॉग लिहिताना भावूक झाले बिग बी; चाहत्यांचे आभार मानताना लिहिले - 'तुम्ही दिलेल्या प्रेमाच्या तुलनेत मी काहीही केले नाही'

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रविवारी रात्री अमिताभ यांनी आपल्या चाहत्यांना विस्तारित कुटुंब म्हटले आणि त्यांनी आपला ब्लॉग या कुटुंबाच्या नावी लिहिला.
  • बिग बींनी बाबूजी हरिवंश राय बच्चन यांची कविता आपल्या कुटुंबाची काळजी घेत असलेल्या डॉक्टरांना समर्पित केली.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात मागील 10 दिवसांपासून कोरोनावर उपचार सुरू आहेत. प्रार्थनांसाठी ते सततचाहत्यांचे आभार मानत असतात. रविवारी रात्री त्यांनी चाहत्यांसाठी एक भावनिक ब्लॉग पोस्ट केला. ते म्हणाले की, विस्तारित कुटुंबाने दिलेल्या प्रेमाच्या तुलनेत मी काहीही केले नाही.

  • बिग बींनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले-

या प्रेमापेक्षा मोठे काही नाही, जे तुम्ही मला या परीक्षेच्या काळात देत आहात.. आपण माझ्यासाठी प्रार्थना पाठव आहात. आपण आशीर्वादाच्या रुपात दैवी शब्दांचे पावित्र्य पाठव आहात. यापेक्षा मोठे काहीही असू शकत नाही.

हे माझ्यासाठी सर्वात भावनिक क्षण आहेत. इथे तुमच्यासारख्या अनेक प्रिय व्यक्ती आहेत जे मनापासून, हृद्यापासून माझी काळजी घेत आहेत, हे जाणून मला खूप आनंद झाला. मला माहित नाही तुझ्या प्रेमाची मर्यादा काय आहे? आपण सर्वांनी एवढ्या वर्षांत मला दिलेल्या प्रेमाच्या तुलनेत मी काहीही दिले नाही, काहीही केलेले नाही. मी माझ्या परीने या कुटुंबास 'वास्तविक कुटुंब' बनवण्याचा प्रयत्न केला आणि आपण मला कधीही निराश केले नाही.

तुम्ही माझा अभिमान आहात. असा अभिमान, जो मला प्रत्येक व्यासपीठावर पाहायला मिळतो. माझे हृदय भावनांनी भरलेले आहे आणि या पवित्र ब्लॉगवर माझे अश्रू पसरण्याआधी… शुभ रात्री माझी एक्सटेंडेड फॅमिली.

तुझे प्रेम सर्व गोष्टींच्या पलीकडे आहे.

  • डॉक्टरांना समर्पित केली बाबूजींची कविता

अमिताभ त्यांचे वडील डॉ. हरिवंश राय बच्चन यांचेही स्मरण करत असून त्यांच्या कविता ट्विटरवर शेअर करत आहेत. रविवारी रात्री बिग बींनी बाबूजींची एक कविता आपल्या कुटुंबाची काळजी घेत असलेल्या डॉक्टरांना समर्पित केली.

हेल्थ अपडेट 

  • 77 वर्षीय अमिताभ बच्चन आणि त्यांचा 44 वर्षीय मुलगा अभिषेक हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर 11 जुलैला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सहा दिवसांनी  17 जुलै रोजी, सून ऐश्वर्या (46) आणि नात आराध्या (8) यांनाही तब्येत बिघडल्यानंतर रुग्णालयात हलवण्यात आले. 
  • 18 जुलैच्या हेल्थ अपडेटनुसार, चौघांची प्रकृती वेगाने सुधारत आहे. बिग बी आणि अभिषेक यांना आज किंवा उद्या नॉर्मल वॉर्डमध्ये हलविले जाऊ शकते.
  • बच्चन कुटुंबातील चारही सदस्यांना या आठवड्यात रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो.  या चौघांवर डॉ. बर्वे आणि डॉ. अन्सारी यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. हे दोन्ही डॉक्टर बर्‍याच काळापासून बच्चन कुटुंबातील वैद्यकीय सल्लागार आहेत.