आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमिताभ झाले ट्रोल:78 वर्षीय बिग बींनी दिल्या छठ पूजेच्या शुभेच्छा, नेटक-यांनी लक्षात आणून दिली चूक आणि म्हणाले - लिहायला शिका

4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिग बींनी चुकून छठ ऐवजी छत असा उल्लेख केला आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर चाहत्यांना छठ पूजेच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये चुकून 'छठ'ऐवती 'छत' असे लिहिले, ज्यामुळे सोशल मीडियावर नेटक-यांनी त्यांना ट्रोल केले आहे. 78 वर्षीय बिग बींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, "छठ पूजा (प्रतिहार षष्ठी / सूर्य षष्टी)... सर्वांना नमस्कार... सूर्याकडे त्याच्या परोपकारासाठी आशीर्वाद घेताना. शुक्रवार, 20 नोव्हेंबर. छत (छठ) पूजेच्या अनेक शुभेच्छा." अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले.

सोशल मीडियावर नेटक-यांच्या प्रतिक्रिया, बघा प्रिंट स्क्रिन

दोन दिवसांपूर्वीही झाली होती अशी चूक

दोन दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी आपल्या एका ट्विटमध्ये अशीच चूक केली होती. बिग बींनी महात्मा गांधींचा एक कोट शेअर केला होता आणि लिहिले होते, "आपको आता है यह किसने कहा था?" चार तासांनंतर त्यांच्या लक्षात चुक आली की 'आपको आता है'ऐवजी 'आपको पता है' असे असायला हवे. बिग बींनी आपली चुक सुधात सोशल मीडिया यूजर्सकडे दिलगिरी व्यक्त केली होती.

अमिताभ यांनी ट्विटमध्ये लिहिले-