आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हॉस्पिटलमधील अमिताभ यांचा तिसरा दिवस:ब्लॉगमध्ये चाहत्यांचे आभार मानत बिग बींनी लिहिले - 'मी नतमस्तक आहे'; कोलकातामध्ये त्यांच्यासाठी महामृत्युंजय यज्ञ सुरु 

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शनिवारी अमिताभ बच्चन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
  • बच्चन यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टर म्हणाले - त्यांना विशेष उपचारांची गरज नाही

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यापासून ते मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल आहेत. तेथील आयसोलेशन वॉर्डात त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. चाहते त्यांच्यासाठी सातत्याने प्रार्थना करत असून बिग बीसुद्धा त्यांचे आभार मानत आहेत. सोमवारी रात्री त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये कवितेच्या माध्यमातून सर्व चाहत्यांचे आभार मानले आणि म्हटले की, तुमच्या भावना आणि प्रार्थनेपुढे मी नतमस्तक आहे.

  • अमिताभ यांनी ठिकाण म्हणून ‘कोविड वार्ड हॉस्पिटल’ असा उल्लेख केला :

प्रार्थनाओं, सदभावनाओं की मूसलाधार बारिश ने 

स्नेह रूपी बंधन का बांध तोड़ दिया है, 

बह गया, तर कर दिया मुझे इस अपार प्यार ने,

मेरे एकाकीपन के अंधेरे को जो  तुमने,

प्रज्वलित कर दिया है  

व्यक्तिगत आभार मैं व्यक्त न कर पाऊंगा ,

बस शीश झुकाके नतमस्तक हूं मैं। 

अमिताभ बच्चन यांचा ब्लॉग, जो त्यांनी सोमवारी रात्री अपडेट केला.
अमिताभ बच्चन यांचा ब्लॉग, जो त्यांनी सोमवारी रात्री अपडेट केला.
  • कोलकात्यात महामृत्युंजय यज्ञ सुरु

कोलकात्यात अमिताभ बच्चन यांच्या चाहते त्यांच्या प्रकृती स्वास्थासाठी महामृत्युंजय यज्ञ करत आहेत. जोपर्यंत बच्चन कुटुंबीय या संकटातून बाहेर पडत नाही तोपर्यंत हा यज्ञ सुरुच राहील असे चाहत्यांनी सांगितले आहे. अमिताभ बच्चन फॅन्स असोसिएशनचे सदस्य संजय पटोडिया यांनी आपल्या एका निवेदनात ही माहिती दिली.

  • शनिवारी अमिताभ यांनी स्वत: दिली होती माहिती

अमिताभ बच्चन यांनी शनिवारी रात्री स्वत: टि्वट करुन कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी रुग्णालयात दाखल झालो आहे. काही चाचण्या आणखीही केल्या जाणार आहेत. मागील दहा दिवसात जे माझ्या संपर्कात आले होते त्यांनीही चाचणी करावी असे आवाहन मी करतो आहे.” या आशयाचे ट्विट त्यांनी केले होते.

  • ऐश्वर्या-आराध्या घरीच आयसोलेट 

बिग बींची सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या यांचीही कोविड टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. तथापि, बीएमसीने त्यांना घरीच आयसोलेट  केले आहे. अमिताभ यांच्या पत्नी जया बच्चन, मुलगी श्वेता बच्चन नंदा, नात नव्या नवेली आणि नातू अगस्त्य यांची कोविड-19 ची टेस्ट निगेटिव्ह आली आहे.