आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढदिवशी बिग बींचा मोठा निर्णय:अमिताभ बच्चन यापुढे पान मसाल्याची जाहिरात करणार नाहीत, ब्रँडसोबतचा करार रद्द केला, प्रमोशन फीही परत केली

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिग बींनी आपल्या अधिकृत ब्लॉगवर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आज त्यांचा 79 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास दिवशी अमिताभ यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी 'कमला पसंद'सोबतचा करार संपुष्टात आणला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ब्लॉगवर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.

अमिताभ बच्चन यांच्या ब्लॉगवर त्यांच्या ऑफिसच्या वतीने सांगण्यात आले आहे, 'कमला पसंद जाहिरात प्रसारित झाल्यानंतर काही दिवसांनी अमिताभ बच्चन यांनी ब्रँडशी संपर्क साधला आणि गेल्या आठवड्यात करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. जेव्हा अमिताभ बच्चन या ब्रँडशी संबंधित होते, तेव्हा ही जाहिरात सरोगेट जाहिरांतीअंतर्गत येत असल्याची त्यांना त्यांना माहिती नव्हती. अमिताभ यांनी ब्रँडसोबतचा करार संपुष्टात आणला आहे आणि प्रमोशन फी देखील परत केली आहे.'

पान मसाल्याच्या जाहिरातीवरुन ट्रोल झाले होते बिग बी
काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन रणवीर सिंहसोबत कमला पसंद पान मसाल्याच्या जाहिरातीत दिसले होते. शाहरुख खान, अजय देवगण यांच्या प्रमाणे पान मसाल्याची जाहिरात केल्याने बिग बींना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. बिग बींनी एक पोस्ट शेअर केली होती, त्यात त्यांनी लिहिले होते, 'घड्याळ खरेदी करुन हातावर काय बांधले, वेळ मागे पडला.' या ट्वीटमध्ये एका यूजरने कमेंट करताना लिहिले होते, 'नमस्कार सर तुम्हाला एक विचारायचे आहे, तुम्हाला कमला पसंद पान मसाला ही जाहिरात करायची अशी काय वेळ आली. मग तुमच्यात आणि इतर कलाकारांमध्ये काय फरक?'

बिग बींनी ट्रोलरला समजावून सांगितले होते व्यवसायाचे गणित
या युजरच्या कमेंटला अमिताभ यांनी उत्तर दिले होते. त्यांनी लिहिले होते, 'मला माफ करा कोणत्या व्यवसायाला कमी जास्त मानू नये, आपल्यामुळे जर एखाद्याचे भले होत असेल तर ते करायला हरकत आहे. जर एखादा व्यवसाय असेल तर आपल्याला आपल्या व्यवसायाबद्दल देखील विचार करावा लागतो. आता तुम्हाला असे वाटते की मी ही जाहिरात करायला नको होती पण मला यासाठी मानधान मिळते. आमच्या व्यवसायात काम करणारे अनेक लोक आहेत, ज्यांना रोजगार आणि मानधन मिळते आणि माझे काही चुकले असेल तर पुन्हा मला माफ करा.'

एनजीओने बिग बींना ही जाहिरात सोडण्याची केली होती विनंती
राष्ट्रीय तंबाखूविरोधी संघटने (एनजीओ)ने काही दिवसांपूर्वी बिग बींना एक पत्र पाठवत लवकरात लवकर या जाहिरातीच्या कॅम्पेनमधुन बाहेर पडण्याची विनंती केली होती. नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर एरडिकेशन ऑफ टोबॅको या संघटनेचे अध्यक्ष शेखर साळकर यांनी बिग बींना यासंदर्भात पत्र पाठवले होते. ते म्हणाले होते की, ‘संशोधनात पान मसाला आणि तंबाखूच्या व्यसमानुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात हे सिद्ध झाले आहे. विशेषतः तरुणांसाठी हे अधिक हानीकारक आहे. मिस्टर बच्चन हे सरकारच्या पल्स पोलिओ जाहिरातीच्या मोहिमेचे ब्रॅण्ड एम्बेसेडर आहेत तर त्यांनी पान मसाल्याच्या जाहिरातीतून लवकरात लवकर बाहेर पडणे गरजेच आहे.’

शेखर साळकर यांनी या पत्रात इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) यांच्या पुराव्यांचा दाखला देत पान सुपारीमधील कार्सिनोजेन्समुळे तोंडाचा कर्करोग होऊ शकतो असा दावा केला. ते म्हणाले होते, 'ऑन्कोलॉजिस्ट आणि तंबाखू बंदीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेचा सदस्य या नात्याने मला दु:ख होत आहे की, बॉलिवूडमधील शाहरुख खान, अजय देवगण, रणवीर सिंह अशा अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींनी अशा जाहिराती केल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूचे सेवन वाढू लागले आहे.'

बातम्या आणखी आहेत...