आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हृदयस्पर्शी पोस्ट:अमिताभ यांनी सफाई कामगारांना म्हटले शुभचिंतक, लिहिले - कोण म्हणतं की जलसावर रविवारची वेल विशर मीटिंग बंद झाली आहे

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • असे 11 रविवार निघून गेले, जेव्हा बिग बींच्या जलसाबाहेर गर्दी जमली नाही आणि बिग बीही बंगल्याबाहेर आले नाहीत.

अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येक रविवारी त्यांचे चाहते जलसाबाहेर मोठी गर्दी करतात, या गर्दीला बिग बी कधीही नाराज करत नाहीत. मात्र लॉकडाऊन सुरु झाल्यापासून गेल्या कित्येक वर्षांचा हा नियम मोडित निघाला. असे 11 रविवार निघून गेले, जेव्हा बिग बींच्या जलसाबाहेर गर्दी जमली नाही आणि बिग बीही बंगल्याबाहेर आले नाहीत. पण स्वतः अमिताभ असे मानत नाहीत. त्यांच्या मते, बंगल्याबाहेर झाडू मारणारे सफाई कर्मचारीसुद्धा त्यांचे शुभचिंतक आहे, जे कोरोनाव्हायरसच्या काळात आपली जबाबदारी जोख बचावत आहेत.

अमिताभ यांनी ट्विटरवर सफाई कर्मचा-यांचे काही फोटो शेअर केले करुन एक ह्रदयस्पर्शी पोस्ट लिहिले आहे. आपल्या भावना व्यक्त करताना बिग बींनी लिहिले की, "कोण म्हणतं की जलसावरची रविवारची वेल विशरची मीटिंग बंद झाली आहे... हे बघा."

15 मार्चपासून चाहत्यांना भेटले नाहीत 

गेल्या 15 मार्चपासून अमिताभ बच्चन त्यांना चाहत्यांना भेटले नाहीत. त्यांनी स्वत: ट्विटरवर रविवारचे दर्शन रद्द करण्याची घोषणा केली होती. 15 मार्च रोजी बिग बींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, “सर्व शुभचिंतकांना प्रार्थना आहे की, आज संध्याकाळी जलसाच्या गेटवर जमू नका. मी रविवारी तुमच्या भेटीला येत नाहीये. सावध रहा, सुरक्षित रहा. रविवारचे दर्शन जलसावर रद्द आहे, कृपया येथे जमू नका."

ही परंपरा 37 वर्षांपूर्वी सुरू झाली होती

 

अमिताभ प्रत्येक आठवड्यात रविवारी चाहत्यांसोबत होणा-या भेटीची छायाचित्रे आपल्या ब्लॉग आणि सोशल मीडियावर शेअर करत असतात. ही सिलसिला 1982 मध्ये सुरू झाला, जो 2019 पर्यंत कोणत्याही व्यत्ययाशिवाय चालू राहिला. परंतु मागील वर्षी त्यांच्या आजारपणामुळे आणि यावर्षी कोरोना संसर्गाच्या जोखमीमुळे हा खंड मोडीत निघाला. 

बातम्या आणखी आहेत...