आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावरून:अमिताभ बच्चन ऋषिकेशला पोहोचले, गंगा आरतीत झाले सहभाग, बिग बींची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चिदानंद यांनी बिग बींचे केले कौतुक

बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये ते उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये पूजा आणि गंगा आरती करताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत चिदानंद सरस्वतीही दिसत आहेत. यावेळी बिग बी एथनिक लूकमध्ये दिसले. चाहते बिग बींची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक दिसले.

चिदानंद सरस्वतींसोबत दिसले बिग बी
अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर काही फोटोही शेअर केले आहेत, ज्यात ते गंगा घाटाच्या काठावर बसलेले दिसत आहेत. यासोबतच त्यांनी स्वामी चिदानंद सरस्वती यांच्यासोबतचे फोटोही शेअर केले आहेत. स्वामी चिदानंद सरस्वती हे परमार्थ निकेतनचे अध्यक्ष आहेत. फोटोंमध्ये बिग बी कुर्ता पायजमा आणि नेहरू जॅकेटमध्ये दिसत आहेत.

चिदानंद यांनी बिग बींचे केले कौतुक
व्हिडिओत परमार्थ निकेतनमध्ये बिग बींचे स्वागत करताना चिदानंद म्हणाले, "आपल्या कलेच्या बळावर बिग बींनी अनेक विक्रम प्रस्थापित करून देशाचे नाव रोशन केले आहे." बिग बी सध्या उत्तराखंडमध्ये त्यांच्या आगामी 'गुडबाय' चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. यामुळे बिग बी ऋषिकेशच्या गंगा घाटावर पोहोचले.

बिग बींचे प्रोजेक्ट्स
बिग बींच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ते अलीकडेच नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटाशिवाय ते रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत 'ब्रह्मास्त्र', अजय देवगणसोबत 'रनवे 34', रश्मिका मंदान्नासोबत 'गुडबाय' आणि दीपिका पदुकोणसोबत 'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहेत.