आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी:अमिताभ आणि जया यांच्या लग्नाला 48 वर्षे पूर्ण, बिग बींनी शेअर केली खास छायाचित्रे; शुभेच्छा दिल्याबद्दल चाहत्यांचे मानले आभार

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 3 जून 1973 रोजी बिग बी आणि जया लग्नाच्या बेडीत अडकले होते.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन आज आपल्या लग्नाचा 48 वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांना शुभेच्छा देत आहेत. लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही अमिताभ यांनी पत्नी जयासोबतचे काही खास फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. सोबतच शुभेच्छांसाठी सर्वांचे आभारदेखील त्यांनी मानले आहेत.

आपल्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद
अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेले फोटो त्यांच्या लग्नाचे आहेत. ज्यामध्ये अमिताभ आणि जया लग्नाच्या विधी पूर्ण करताना दिसत आहेत. हे खास फोटो शेअर करत बिग बींनी लिहिले, "3 जून 1973.. आमच्या लग्नाचा वाढदिवसानिमित्त तुमच्या शुभेच्छा आणि प्रेमासाठी खूप खूप आभार."

सेलिब्रिटींनी केला शुभेच्छांचा वर्षाव
अमिताभ यांच्या या पोस्टनंतर चाहत्यांसोबत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. भूमी पेडणेकरने अमिताभ यांच्या पोस्टवर कमेंट करताना लिहिले, "हॅपी अॅनिव्हर्सरी लीजेंड्स." शिल्पा शेट्टीने लिहिले, "अमिताभ बच्चन जी आणि जया आंटी यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा."

आहाना कुमराने लिहिले, "हॅपी अ‍ॅनिव्हर्सरी सर आणि जया मॅम." याशिवाय दीया मिर्झा, बिपाशा बसू, सोनल चौहान, नेहा धुपिया यांच्यासह अनेक सेलेब्सनी अमिताभ आणि जया यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...