आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चन यांचे 75% यकृत निकामी:40 वर्षांपूर्वी  कुलीच्या अपघातानंतर क्लिनिकली डेड झाले होते, आता वयाच्या 80 व्या वर्षी करत आहेत 6 चित्रपट

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमिताभ बच्चन वयाच्या 80 व्या वर्षी चित्रपटांमध्ये कार्यरत आहेत. सध्या त्यांच्या हातात सहा चित्रपट आहेत. अलीकडेच ते 'ब्रह्मास्त्रम'ध्येही झळकले. या चित्रपटात ते अ‍ॅक्शन करताना दिसले होते. सध्या ते 'प्रोजेक्ट-के' या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी होते. पण चित्रपटातील अ‍ॅक्शन सीक्‍वेन्‍सचे शूटिंग करताना हैदराबादमध्ये त्यांच्या बरगड्याला दुखापत झाली. या अपघातात अमिताभ बच्चन यांचे स्नायू फाटले असून त्यांना श्वास घेण्यासही त्रास होतोय. अपघातानंतर लगेचच शूटिंग थांबवून अमिताभ यांना प्राथमिक उपचारानंतर मुंबईला पाठवण्यात आले आहे. या घटनेची माहिती स्वतः अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे दिली आहे.

अमिताभ यांचा सेटवर अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 40 वर्षांपूर्वी 26 जुलै 1982 रोजी कुलीच्या सेटवर अमिताभ यांना अंतर्गत गंभीर दुखापत झाली होती. आतडे फाटल्याने अमिताभ यांना 4 दिवस वेदना होत होत्या, त्यांना झालेल्या दुखापतीचे निदान योग्य वेळी होऊ शकले नाही. आतडे फाटल्यामुळे संसर्ग इतका पसरला होता की, डॉक्टरांना तत्काळ ऑपरेशन करावे लागले होते.

ऑपरेशननंतर त्यांना खूप ताप आला आणि हृद्याचे ठोके 72 ऐवजी हृदयाचे ठोके 180वर गेले. त्यामुळे ते कोमात गेले. याआधीच अमिताभ दमा, कावीळ, किडनीच्या समस्येशी झुंजत होते. तीन दिवस डॉक्टरही घाबरले होते आणि संपूर्ण देश बिग बींसाठी प्रार्थना करत होता. अनेक समस्या आणि ऑपरेशन्सनंतर बिग बी 3 महिन्यांनी बरे होऊन परतले, त्यावेळी देशात जल्लोषाचे वातावरण होते.

यानंतरही अनेकदा बिग बींना चित्रीकरणाच्या सेटवर अपघात झाला. गंभीर आजारांवर मात करत आज वयाच्या 80 व्या वर्षीही यशस्वी करिअर करणाऱ्या बिग बींच्या प्रवासावर एक नजर-

या चित्रपट आणि शोच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांना झाली दुखापत

  • प्रोजेक्ट के
  • ठग्स ऑफ हिंदुस्थान
  • कुली
  • कौन बनेगा करोडपती 14 (शो)

'कुली' चित्रपटाच्या सेटवर नेमके काय घडले होते?

जवळजवळ 40 वर्षांपूर्वी वर्षांपुर्वी अमिताभ बच्चन यांना एक भयंकर अपघात झाला होता. जुलैच्या शेवटचा आठवडा सुरु होता. अमिताभ बच्चन 26 जुलै 1982 रोजी बंगळुरुमध्ये 'कुली' चित्रपटाची शूटिंग करत होते. एका फाइट सीनची शूटिंग सुरु होती. अ‍ॅक्शन डायरेक्टरने सांगितल्यानुसार पुनीत इस्सर यांना अमिताभ यांच्या पोटात बुक्का मारायचा होता आणि त्यांना टेबलवर पडायचे होते. हा सीन अमिताभ यांच्या बॉडी डबलसोबत करण्याचे सजेशन देण्यात आले होते. परंतू बिग बी यांना या सीनला रिअल टच द्यायचा होता. यामुळे त्यांनी स्वतः हा सीन करण्याचा निर्णय घेतला. कलाकार तयार झाले. लाइट्स ऑन झाले. कॅमरा अँगल सेट करण्यात आला. डायरेक्टरने अ‍ॅक्शन म्हणताच शूटिंग सुरु झाली. शॉट ओके झाला आणि लोक टाळ्या वाजवू लागले. अमिताभ यांच्या चेह-यावरही स्माइल होती. परंतू तेव्हा त्यांना पोटात वेदना सुरु झाल्या. पुनीत इस्सर यांनी त्यांच्या पोटात जोरदार मुक्का मारला होता. 'कुली' शूटिंग दरम्यान झालेली ही इजा सुरुवातीला खुप सामान्य होती. परंतू दोन दिवसांनंतर ही घातक ठरली याचा त्रास त्यांना आजही होतो.

डॉक्टरांना सुरुवातीला सापडली नाही जखम
बिग बी यांना वेदना होत होत्या. त्यांना इजा कुठे झाली आहे हे त्यांना माहिती होते. परंतू त्यामधून एक थेंबही रक्त बाहेर पडले नव्हते. यामुळे बिग बी आणि कास्ट-क्रू मेंबर्सला ही जखम किरकोळ वाटली. त्यांच्या पोटावर दोन वेळा मलम लावण्यात आला. परंतू त्यांना आराम मिळाला नाही. म्हणून ते हॉटेलवर आराम करण्यासाठी गेले. तिथे डॉक्टरांना बोलावण्यात आले. डॉक्टर म्हणाले की, जखम खोल नाही. डॉक्टर औषध देऊन निघून गेले. अपघाताच्या दुस-या दिवशीही वेदना कमी झाल्या नाही.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या पर्सनल फिजिशियन के. एम. शाह यांना बोलावले. डॉ. शाह यांनी त्यांची अवस्था पाहून त्यांना बंगळुरुच्या सेंट फिलोमेना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांचा एक्स-रे काढण्यात आला. तरीही त्यांना कोणत्याही प्रकारची गंभीर जखम दिसली नाही. तेव्हा बिग बींच्या अजून टेस्ट कराव्या असा सल्ला एक्सपर्टने दिला. तिस-या दिवशीही त्यांच्या परिस्थितीत सुधारणा झाली नाही. पुन्हा एकदा एक्स-रे काढण्यात आला. कोणताही गंभीर आजार निघाला नाही. डॉक्टरांनी एक्स-रे बारीक चेक केला. तेव्हा त्यांना डायफ्रामच्या खाली गॅस दिसत होते. ते फाटलेल्या आतड्यांमधून बाहेर पडत होते.

नंतर शरीरात इन्फेक्शन पसरले
चौथ्या दिवशी अमिताभ यांची परिस्थिती बिघडली. वेल्लोरच्या प्रसिध्द सर्जन एच.एस. भट्ट यांनी अमिताभ बच्चन यांची केस पाहिली. रिपोर्ट पाहता डॉ. भट्ट म्हणाले की, 'तत्काळ ऑपरेशन करावे लागेल. कारण इन्फेक्शन बिग बींच्या बॉडीमध्ये पसरले आहे.' अमिताभ यांना खुप ताप होता. ते वारंवार उलटी करत होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारात त्यांची तब्येत खुप बिघडली. त्यांच्या हृदयाचे ठोके एका मिनितात 72 असायला हवे तर 180 च्या स्पीडने सुरु झाले. यानंतर ते कोमामध्ये गेले.

सर्जरीनंतर डॉक्टर हैरान होते
डॉक्टरांनी ऑपरेशन सुरु केले. त्यांनी बिग बींचे पोट चिरुन पाहिले तर ते हैराण होते. अमिताभ यांच्या पोटातील महत्त्वाची आतडी (पोटातील अंगांना जोडून ठेवणारी आणि केमिकल्सपासून बचाव करणारी) फाटली होती. लहान आतडीही डॅमेज झाली होती. या स्थितीत कोणीही 3-4 तासांपेक्षा जास्त जिवंत राहणे अवघड असते. परंतू अमिताभ 3 दिवस या परिस्थितीत होते. डॉक्टरांनी त्यांची आतडी शिवली.

बिग बींना आधीच दमा, यकृताची समस्या आणि न्यूमोनियाशी झुंज देत होते
अमिताभ बच्चन यांना अपघातापूर्वीच यकृताचा त्रास होता आणि त्यांना दम्याचाही त्रास होता. ऑपरेशननंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना न्यूमोनिया झाला, ज्यामुळे त्याची प्रकृती अधिकच बिघडली. बंगळुरूमध्ये उपचार केल्यानंतर त्यांना एअरबसने मुंबईत आणण्यात आले. त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आले. 8 ऑगस्ट रोजी त्यांच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयाबाहेर चोवीस तास त्यांच्या चाहत्यांची गर्दी होती. संपूर्ण देशात कुठे पूजा होत होती तर कुठे यज्ञ होत होता. स्वत: जया बच्चनही अमिताभ यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करायला सिद्धी विनायक मंदिरात गेल्या होत्या, पण जेव्हा त्या पोहोचल्या तेव्हा त्यांनी पाहिले की अनेक लोक बिग बींसाठी आधीच पूजा करत आहेत. लोकांच्या प्रार्थना देवाने ऐकल्या.

24 सप्टेंबर 1982 रोजी बिग बी यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
24 सप्टेंबर 1982 रोजी बिग बी यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

बिग बींना हेपेटायटीस बी ची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त देण्यात आले
2000 मध्ये अमिताभ बच्चन यांना हेपेटायटीस बी असल्याचे कळले. हा आजार निष्काळजीपणाचा परिणाम होता. कुलीच्या सेटवर झालेल्या अपघातानंतर बिग बींना रक्ताची गरज असताना अनेक रक्तदात्यांची रक्तदान केले होते. त्यांना 200 रक्तदात्यांच्या माध्यमातून 60 बाटल्या रक्त देण्यात आले होते. पण यावेळी नकळत बिग बींना हिपेटायटीस बी ची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त चढवण्यात आले, ज्यातून त्यांना स्वतःला संसर्ग झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बिग बींची हेपेटायटीस बी मोहिमेचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड केली होती, त्यावेळी त्यांनी स्वतः याचा खुलासा केला होता.

जेव्हा बिग बी म्हणाले होते - मी आतून संपलो होतो
बरे झाल्यानंतर अमिताभ बच्चन स्टारडस्ट मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते, 'मला माहित नव्हते की मी मरणार आहे. पण माझ्यासोबत काहीतरी वाईट घडले आहे हे मला माहीत होते. जीवन आणि मृत्यू यांच्यात लढत असताना मी कोमात होतो. मला भानच नव्हते. माझ्या आयुष्यातील हा एक कठीण टप्पा होता, परंतु माझ्यापेक्षा माझ्या कुटुंबासाठी तो अधिक कठीण होता, कारण मला या सर्व गोष्टींची माहिती नव्हती. मी निरोगी आयुष्याची स्वप्ने पाहात होतो, परंतु नंतर मला अचानक कळले की मी आतून संपलो आहे. आता तुम्हाला बोटही हलवता येत नाही, तुमचा पायही साथ देत नाही. हे फक्त एका दिवसात कसे होऊ शकते. मला खूप भीती वाटली होती.'

75 टक्के यकृत निकामी
2000 मध्ये अमिताभ बच्चन यांना पोटदुखीचा त्रास झाला होता. जेव्हा बिग बी उपचारांसाठी रुग्णालयात पोहोचले तेव्हा त्यांना कळले की, त्यांच्या आतड्यात समस्या आहे, ज्यासाठी त्यांच्यावर आतड्याची डायव्हर्टिकुलिटिस शस्त्रक्रिया करण्यात आली. उपचारादरम्यानच बिग बींना लिव्हर सिरोसिस झाल्याचे कळले. हे हेपेटायटीस बी मुळे होते.

एका मुलाखतीत रेग्यूलर चेकअपवर प्रकाश टाकताना बिग बी म्हणाले होते, "मी कायम माझ्या वैयक्तिक अनुभवाचे उदाहरण देत स्वतःच्या तब्येतीबद्दल माहिती घेणे किती महत्त्वाचे आहे हे पटवून देत असतो. सगळ्यांसमोर सांगायला मला काहीच हरकत वाटत नाही की मी टीबीमधून वाचलो आहे, हेपेटायटीस बीमधून वाचलो आहे, बॅड ब्लड इन्फ्युझन झाले होते आणि माझे 75 टक्के यकृत निकामी आहे... पण कारण मी वेळेत याचा शोध लावू शकलो म्हणून आज तब्बल 20 वर्षांनी सुद्धा, जेव्हा माझे 75 टक्के यकृत गेले आहे, मी फक्त 25 टक्क्यावर जिवंत आहे.”

आता बिग बी केवळ 25 टक्के यकृतावर जगत आहेत. 12 टक्के यकृतावरही माणूस जीवंत राहू शकतो, असे बिग बींनी स्वतः मान्य केले.
आता बिग बी केवळ 25 टक्के यकृतावर जगत आहेत. 12 टक्के यकृतावरही माणूस जीवंत राहू शकतो, असे बिग बींनी स्वतः मान्य केले.

औषधांच्या अति सेवनामुळे मायस्थेनिया आजार
अमिताभ बच्चन यांना मायस्थेनिया ग्रॅव्हिस नावाचा स्नायू संबंधित आजार आहे. या आजारात स्नायू आणि मज्जासंस्था यांचा संबंध तुटतो. हा आजार सामान्यतः औषधांच्या अतिसेवनामुळे होतो.

अमिताभ यांना दम्याचा त्रास
अमिताभ बच्चन यांना दमा आहे. या आजारामुळे शरीरातील ऑक्सिजन योग्य प्रमाणात फुफ्फुसापर्यंत पोहोचत नाही. या आजारात रुग्णाला अनेकदा दम्याचा झटका येतो, त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. अशा रुग्णांना धूळ आणि कमी तापमानात राहण्यास मनाई असते. मात्र, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन यांच्या 'हाइट' या चित्रपटात त्यांनी मायनस डिग्री तापमानात चित्रीकरण केले आहे.

क्षयरोगाचा केला आहे पराभव
अमिताभ बच्चन यांना काही वर्षांपूर्वी टीबी अर्थात क्षयरोग झाला होता. पण वेळीच निदान आणि योग्य उपचाराने त्यांनी या आजारावर मात केली.

'ठग्स ऑफ हिंदोस्तान'च्या सेटवर अमिताभ जखमी झाले होते
2018 मध्ये आलेल्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटात अमिताभ बच्चन जबरदस्त अॅक्शन करताना दिसले होते. अ‍ॅक्शन सीनसाठी अमिताभ बच्चन यांना बॉडी डबलचा वापर करण्यास सांगण्यात आले होते. परंतु त्यांनी स्वत: अ‍ॅक्शन सीन्स शूट केले होते. अ‍ॅक्शन सीन करताना त्यांच्या खांद्याला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर नव्हती.

2018 चा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट फ्लॉप ठरला होता.
2018 चा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट फ्लॉप ठरला होता.

KBC 14 च्या शूटिंगदरम्यान पायाची नस कापली गेली होती
2022 मध्ये 'कौन बनेगा करोडपती 14' च्या शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या पायाची नस धातूच्या तुकड्याने कापली गेली होती. सेटवर त्यांच्या पायातून खूप रक्तस्त्राव झाला होता, त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले.

2022 मध्ये कोविड पॉझिटिव्ह झाले होते

2020 मध्ये अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून माहिती दिली होती की, त्यांना कोविडची लागण झाली आहे. अमिताभ यांच्यासोबत त्यांचा मुलगा अभिषेकलादेखील कोरोनाची लागण झाली होती. बिग बी दोन महिने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होते. 2022 मध्येही अमिताभ बच्चन यांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला होता.

बिग बी कायम रुटीन चेकअप करून घेतात
1982 मध्ये झालेल्या अपघातानंतर अमिताभ बच्चन यांना अनेकदा स्नायूंशी संबंधित समस्या निर्माण होत असतात. यासाठी त्यांना अनेकदा हॉस्पिटलमध्ये जावे लागते. याशिवाय बिग बी अनेकदा रूटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये जातात. 2020 मध्येही बिग बी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...